file photo 
नांदेड

सरपंचपदाच्या आरक्षणच्या अंशत: बदलाने कुणाला संधी तर कोणावर आली बंदी; अर्ध्या अर्धापुरात महिलाराज येणार

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील नव्याने काढण्यात आलेल्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत काही गावात आरक्षणानेमुळे काहींना आयती संधी मिळाली तर काहीची आलेली संधी निसटून गेली आहे. मतदारांनी साथ दिली पण आरक्षणाने वाट लावली आशी म्हणण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील आधी घोषित करण्यात आलेल्या अनुसुचित जाती- जमातीच्या आरक्षणात कोणताही बदल झाला नाही. तर काही गावात आरक्षणानेमुळे सरपंचदाचे आरक्षण काहिसा बदल झाला आहे.अर्ध्या अर्धापूरात महिलाराज येणार असून 46 ग्रामपंचायतपैकी 23 गावांचा गावगाडा महिलांच्या हाती येईल.

अर्धापूर तालुक्यातील आगामी 2020 ते 2025 या कालावधीसाठी 46 गावांचे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत उपविभागीय अधिकारी लतीफ पठान यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता. तीन) सकाळी पार पडली. निवडणूक होवून पंधरवडा झाल्याने उत्सुकता वाढली होती. अर्धापूरात आठ अनुचित जाती प्रवर्गासाठी ग्रामपंचायत राखीव राहतील. त्यापैकी चार ग्रामपंचायती महिलांसाठी असतील. तर अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी दोन ग्रामपंचायत राखीव असतील त्यापैकी एक महिलेसाठी राखीव राहील. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी बारा ग्रामपंचायत राखीव असतील. त्यापैकी सहा गावचा कारभार महिलांकडे येईल. तर 24 ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी असून 12 ठिकाणी महिला सरपंच होतील. तालुक्यातील मालेगाव, पिंपळगाव, येळेगाव, लहान, कामठा, पार्डी, निमगाव या मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार कोणाकडे जातो याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील गावनिहाय सरपंचपधाचे आरक्षण पुढीलप्रमाणे

अनुसुचित जाती सर्वसाधरण प्रवर्ग: मेंढला बुद्रूक, पार्डी, दाभड, धामदरी.
अनुसुचित जाती महिला प्रवर्ग: उमरी ,जांभरुण, पिंपळगाव, बरसगाव.
अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी : चेनापूर 
अनुसुचित महिला प्रवर्गासाठी : पाटणूर 
नागरिकाचा मागास प्रवर्ग: भोगाव, गणपूर, येळेगाव, शाहपूर, सांगवी, सावरगाव.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : आंबेगाव, खैरगाव (म), देगाव कु-हाडा, देगाव बुद्रूक, कोंढा, चाभरा.
खुला प्रवर्ग : शेलगाव बुद्रूक, आमराबाद, आमराबाद तांडा, खैरगाव,चाभरा, चोरंबा, देळूब बुद्रूक, पांगरी, बेलसर, मालेगाव, लहान, सोनाळा.
महिला खुला प्रवर्ग : बामणी, लोणी बुद्रूक, कामठा, डौर, दिग्रस नांदला, देळूब खुर्द, निमगाव, मेंढला खुर्द, रोडगी, लोणी खुर्द, शेणी, शेलगाव खुर्द या ग्रामपंचायती राखीव राहतील. तालुक्यातील गावपातळीवर नेत्यांचे लक्ष सरपंच, उपसरपंच निवडीकडे लागले असून बारा तारखेपर्यंत सर्व निवडी पुर्ण करण्याचे पत्र जिल्हाधिका-यांनी काढले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT