मुक्रमाबाद (जिल्हा नांदेड) : देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे पुर्ण झालीत... तरीही ग्रामीण भागातील अनेक वाडी, तांड्यावर रस्ताच पोहचला नाही... अनेकदा मागण्या करूनही शासन व प्रशासनाने कोरड्या आश्वासनाशिवाय हाती काहीच दिले नाही... तिन्ही ऋतूमध्ये नागरिकांना द-यांखो-यातून चिखल तुडवत आयुष्य काढावे लागत आहे...जीव धोक्यात घालून रुग्णांना व बाळांत मातांना खाटेवरच उपचारासाठी घेऊन जावे लागते... विज नाही . वेळेवर पाणी नाही. उपचारासाठी दवाखाना नाही... शिक्षणाची कुठलीच सोय नाही... तरीही सरकार अत्मनिर्भर बनन्याचे नागरिकांना सोनेरी स्वप्न दाखवत आहे... मुखेड तालुक्यातील सोना नाईक तांडा व मुन्ना नाईक तांडा, येथील नागरिक रस्त्यासह नागरी सुविधा मिळविण्यासाठी झुंजत असल्यामुळे सरकारचे अत्मनिर्भर बनन्याचे पितळ उघडे पडले आहे.
मुक्रमाबादपासून जवळच असलेल्या कोट्ग्याळवाडी ग्राम पंचायतअंतर्गत येथील सोना नाईक व मुन्ना नाईक ही, दोन तांडे आडवळणाला असून येथील लोकसंख्या दोन हजार पेक्षाही जास्त आहे. येथील नागरिकांना स्वातंत्र्य तर मिळाला पण भौतिक सुविधा माञ अजूनही मिळाल्या नाहीत. येथील रूग्णांना तांड्यावर वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे रात्री-अपराञी बाळांत मातांना, अपघात झालेल्या व सर्पदंश झालेल्या व्यक्तींना जाळपोळ यासह नैसर्गिक आपत्ती घडल्यानंतरही या सर्वांना उपचारासाठी खाटेवरच घेऊन शहर गाठावे लागत आहे. तर येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे पालक हे, आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणावर अज पाणी सोडण्याची वेळ आलेली आहे. तर जाण्या येण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे याठिकाणी मुलगीही देण्यास टाळत असल्यामुळे तांड्यावरील अनेक मुलांची लग्न होत नाहीत.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून शासनाकडे पाठपुरावा करत आहेत
तांड्यावर रस्त्यासह भौतिक सुविधा द्या म्हणून येथील नागरिक हे, स्वातंत्र्य मिळाल्यापासून शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. पण शासनाकडून येथील नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात येत असून आज, उद्या करतो असे म्हणून वेळ मारून नेत असल्यामुळे येथील नागरिकांचे रस्त्याअभावी मोठे हाल होत आहेत. तर संगणकाच्या या धावत्या युगात वाडी, तांड्यावर असलेल्या मुलांनाही शिक्षण मिळावे यासाठी सरकार पुर्ण प्रयत्नशील असताना माञ या तांड्यावरील विद्यार्थ्यांना माञ जाण्या येण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे शिक्षणाची आवड असतानाही शिक्षण सोडण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. तर दर पाच वर्षाला निवडणूक आल्यानंतर येथील रस्त्यांचा प्रश्न हा उफाळून वर येतो. मतावर डोळा ठेऊन तुमच्या रस्त्याचा प्रश्न हा, मीच निकाली काढणार असे प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराकडून सांगितले जाते. पण एकदा निवडून गेल्यानंतर पुन्हा ते, पाच वर्षानीच मताचा जोगवा मागायला येत असल्यामुळे येथील नागरिक हे, स्वतंत्र्य मिळाल्यापासून आम्हांला रस्ता करून द्या म्हणून शासन दरबारी मागणी करत आहेत. पण शासनान माञ या मागणीला शासन व प्रशासनाकडून पायदळी तुडऊन त्यांच्या भावनेचा खेळ चालविलेला आहे.
राजकिय व्यक्ती खोटे आश्वासन देऊन निवडून येतात
रस्ता करून द्या म्हणून शासनाकडे गेल्या अनेक वर्षापासून मागणी करत आहोत. पण शासनाने रस्ता करून देण्यासाठी प्रत्यक्षात माञ काहीच उपायोजना केल्या नाहीत . त्यामुळेच आम्हांला राञ आपराञी रूग्णांना खाटेवर घालून उपचारासाठी शहर गाठावे लागते. तर राजकीय पुढारी हे, मतावर डोळा ठेऊन रस्ता करून देतो म्हणून खोटे आश्वासन देऊन निवडून येतात.अन् निवडून आल्यानंतर माञ दिलेले आश्वासन विसरून जातात . हे, आमचे दुर्देव आहे.
- सुमानबाई चव्हाण , सरपंच , कोटग्याळवाडी ...संपादन - प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.