lokseva.jpg 
नांदेड

Video : फार्मसिस्टने लढविली अनोखी शक्कल; कोणती ते पाहाच

स्वप्निल गायकवाड

नांदेड ः कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र हाहाकार माजलेला असतांना खबरदारीचा उपाय म्हणून देशासहित महाराष्ट्रात लाॅकडाऊन करुन संचारबंदी लागू करण्यात आली. भांडवलदार व मध्यमवर्गीयच्या जीवनावश्‍यक गरजा पूर्ण होत असल्या तरी सर्व सामान्य, श्रमजीवी, हातावर पोट असणाऱ्या लोकांची पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार भटकण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यातच ज्येष्ठांना आपल्या दैनंदिन लागणाऱ्या औषधींची फार मोठी काळजी लागलेली असते. या मुळे शहरातील लोकसेवा फार्मसीने गर्दी टाळण्यासाठी नविन शक्कल लढविली आहे.

सध्याची परिस्थिती पाहता औषधी दुकानांतील गर्दी टाळण्यासाठी शहरातील लोकसेवा फार्मसीने शटडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. नागरिक हे काेरोना व्हायरस सारख्या रोगाचे गांभीर्य न घेता औषधी खरेदीसाठी सर्रास गर्दी करत आहेत. तसेच आपल्याकडे आणखी तो आला नाही असे सांगत गर्दीच्या स्थळी फिरत आहेत. जर एखादा रुग्ण त्या गर्दीत आला तर तो सर्व नागरिकांना या व्हायरसच्या जाळ्यात ओढू शकतो, हे नागरिकांच्या लक्षात येत नाही. म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करुण, ही गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी लोकसेवा फार्मसीने एकाच वेळी औषधी न देता ती आपल्या काऊंटरवर देण्याची एक नविन शक्कल लढवीली आहे. त्यासाठी लोेकसेवा फार्मसीने एक भन्नाट आयडीया शोधली असून आपल्या काऊंटरवर एक स्लाईडींग ट्रे तयार करून त्याद्वारे रूग्णांना औषधी दिली जात आहे. 

मास्कची मागणी वाढली 
कोरोना विषाणूंची साथ अजूनही जास्तच फैलावू लागली आहे. एकूण बाधित रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. या साऱ्या बातम्या ऐकून लोक भयभीत होताहेत. या आजारावर औषधीही नाही, लसहीस नाही. झटकन काम होण्याची सवय लागलेल्या लोकांना हात धुवा, दूर राहा, गर्दीत जाऊ नका या सूचना पाळणं जरा जडच जातंय. अशा लोकांमध्ये तोंडाला मास्क लावला की आजार आपल्याला होणारच नाही, असा पक्का भ्रम घर करून बसलेला असून आता लहान मुलांचे एन-९५ मास्कची मागणी वाढल्याचे लोकसेवा फार्मसीचे संचालक विजय वाघमोडे यांनी सांगितले.

बाजारातले सगळे मास्क गायब
करोनाचा विषाणू नाकातोंडातून शरीरात जातो. त्यामुळे चेहऱ्याला मास्क लावला की काम फत्ते किंवा आपण पूर्ण सुरक्षित, अशी भावना वेगाने पसरत गेली आणि बाजारातले सगळे मास्क गायब झाले. १५० रुपयांचा मास्क ९०० रुपये टेकवले तरी मिळेनासा झाला. एवढंच काय; पण ऑनलाइन बाजारांमध्येही तो दुर्मिळ झाला. कारण हा मास्क का वापरायचा, याचे खरे कारण काय, तो कुणी वापरायचा, त्याचा वापर किती काळ करायचा आणि वापरून झाल्यावर त्याचे काय करायचे, याबद्दल समस्त लोकांत अनभिज्ञता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT