नायगाव ( जिल्हा नांदेड ) : मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या उमेश पाटील या शिक्षकाचे कोरोनामुळे (ता. २०) एप्रिल रोजी निधन झाले. पण कोसळलेल्या संकटामुळे त्या मयत शिक्षकाचा संसारच उघड्यावर पडला होता. त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी नायगाव तालुक्यातील शिक्षकांनी मदतीचा हात पुढे करुन तब्बल तीन लाख ६८ हजार रुपयाची आर्थिक मदत केली आहे. शिक्षकांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून केलेली मदत ही संसार सावरण्यासाठी निश्चितच उपयोगाची ठरणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील उमेश पाटील हे साधन व्यक्ती म्हणून २०१४ पासून नायगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत होते. पण एप्रिल महिण्यातील ता. २० तारखेला त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने दु: खद निधन झाले. उमेश पाटील यांच्या अचानक जाण्याने पत्नी श्रीमती पदमा पाटील व चिमुकले बाळ यश व वृद्ध आईचे छत्र हरवले. दुखाचा डोंगर कोसळल्याने विधवा पत्नीपुढे चिमुकल्यासह जगावे कस असा पेचप्रसंग उभ राहीला तर आईने म्हातारपणातील आधार गमावल्याने तिच्यापुढेही संकट निर्माण झाले होते.
हेही वाचा - जर तुम्ही नोकरी करणारे असाल तर ही बातमी नक्की वाचा
मानधनावर कार्यरत असलेले साधन व्यक्ती असलेल्या उमेश पाटील यांच्या अचानक जाण्याने कुटुंब उघड्यावर पडले असल्याची बाब सहकारी शिक्षक अशोक पवळे यांना समजले. त्यामुळे पवळे यांनी शिक्षकांच्या ग्रुपवर ही माहिती व्हायरल केली आणि मयत उमेश पाटील यांना पेंशन तर नाहीच पण मानधन जास्त नव्हते. त्यामुळे संकटात असलेल्या कुटुंबाला अर्थिक मदतीची गरज असल्याचे आवाहन केले. प्रत्येक शिक्षकाने आपापल्या पध्दतीने अर्थिक मदत केल्याने तब्बल तीन लाख ६८ हजार रुपये जमा झाले होते. ही जमा झालेली रक्कम कसलाही गाजावाजा न करता ता. ३१ मे रोजी मयत उमेश पाटील यांच्या पत्नी पद्मा पाटील यांना सन्मानाने सुपूर्द करण्यात आली.
अशोक पवळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून नायगाव तालुक्यातील शिक्षक, केंद्रीय मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आदींनी आर्थिक मदत केली आहे. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलल्यास काय होवू शकते याचे ज्वलंत उदाहरण नायगाव येथे घडले असून कोरोनाच्या संसर्गाने अचानक गेलेल्या शिक्षकाच्या कुटुंबाला शिक्षकांनीच आधार दिला असल्याने शिक्षकांनी केलेल्या मदतीचे कौतुक होत आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.