Police Patil Recruitment in nanded 14 taluka stall from last 10 years esakal
नांदेड

Police Patil Recruitment : पोलिस पाटील भरतीबाबत प्रश्नचिन्ह? जिल्ह्यात भरतीची जाहिरात; माहूर-किनवटला आरक्षण सोडत

नांदेड जिल्ह्यात सात उपविभागातील १४ तालुक्यात पोलिस पाटील यांची रिक्त पदे भरण्यासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

माहूर : आरक्षणातील संभ्रम, कोरोना, निवडणूक आचारसंहिता अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील पोलिस पाटील भरती प्रक्रिया मागील दहा वर्षांपासून रखडली होती. राज्य शासनाने पोलिस पाटील भरतीस परवानगी दिल्याने नांदेड जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित पोलिस पाटील भरतीला हिरवा कंदील मिळाला असून किनवट उपविभागातील माहूर आणि किनवट अशा दोन तालुक्यातील पोलिस पाटलांच्या रिक्त पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया राबविण्यात आली;

परंतु यामध्ये अनुसूचित क्षेत्र (पेसा) गावांचा सुद्धा समावेश झाल्याने भरतीच्या तोंडावर फेर आरक्षण सोडत काढावी लागल्याने किनवट उपविभागाच्या पोलिस पाटील भरतीवर सध्या प्रश्नचिन्ह लागले आहेत.

नांदेड जिल्ह्यात सात उपविभागातील १४ तालुक्यात पोलिस पाटील यांची रिक्त पदे भरण्यासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून पद भरतीची जाहिरात (ता.एक) जानेवारी रोजी काढण्यात आली आहे.

अर्ज करण्याची शेवटची (ता.आठ) जानेवारी आहे, तर ता.१४ जानेवारीला पोलिस पाटील पदभरतीची लेखी परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील इतर उपविभागांबरोबर किनवट उपविभागीय कार्यालयाने सुद्धा माहूर आणि किनवट तालुक्यातील एकूण ६७ रिक्त पदासाठी गावोगावी जाहीर प्रगटन लावून आरक्षण सोडत काढली;

परंतु किनवट उपविभागात अधिकांश गावे अनुसूचित क्षेत्र (पेसा) समाविष्ट असल्याने अनुसूचित क्षेत्र आणि बिगर अनुसूचित क्षेत्रातील पोलिस पाटील पदभरती करीता प्रवर्गनिहाय आरक्षण व महिला आरक्षणाबाबत ताळमेळ चुकल्याने (ता.एक) जानेवारी रोजी किनवट तहसील कार्यालयात बिगर अनुसूचित क्षेत्रातील एकूण ४१ गावांची सुधारित आरक्षण सोडत पार पडली.

दरम्यान पेसा आरक्षणामुळे घोळ झाल्याने आपसूकच किनवट उपविभागाची पोलिस पाटील पद भरती लांबणीवर पडण्याचे संकेत दिसू लागले आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यात पोलिस पाटील भरतीची जाहिरात येऊन धडकल्याने किनवट उपविभागातील उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

प्रशासन-जनतेचा समन्वय

पोलिस पाटील हे पद गावात प्रतिष्ठेचे पद म्हणून ओळखले जाते. पोलिस आणि महसूल प्रशासनासाठी महत्त्वाचा समन्वय असतो. गावातील अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देणे, गुन्ह्यांच्या तपासात मदत करणे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची जबाबदारी असते. गावात साथीचे आजार आल्यास त्याची माहिती महसूल प्रशासनाला देणे आदी कर्तव्य पोलिस पाटील यांचे असतात.

जिल्ह्यातील उपविभागनिहाय पोलिस पाटलांची रिक्त पदे

नांदेड - अर्धापूर ८८

भोकर -मुदखेड ८२

कंधार -लोहा १७०

हदगाव -हिमायतनगर१०१

देगलूर -मुखेड १४३

धर्माबाद -उमरी ६४

बिलोली - नायगाव ९७

(किनवट - माहूर उपविभागात बिगर अनुसूचित क्षेत्र (पेसा) ची गावे ४१ इतकी असून अनुसूचित क्षेत्राअंतर्गत गावात २६ पदे अशी एकूण ६७ पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT