Power cut During Women family plan operation sakal
नांदेड

Nanded : कुटुंब शस्त्रक्रिया सुरू असतानाच विद्युत पुरवठा खंडित

रुग्णांसह प्रशासनाकडून रोष : स्वतंत्र पुरवठा देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

बरडशेवाळा : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर अती संवेदनशील असलेल्या बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार जवळगावकर यांनी आपले शासन दरबारी वजन खर्च करून विविध योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये निधी उपलब्ध करुन दिला. यात सुंदरतेने चकाकी करीत डॉ.भिसे, डॉ. बरगे हे दोन अनुभवी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध केले.

या मुळे कार्यक्षेत्रातील रुग्णांना शासनाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात येत असलेल्या सर्व सोयीचा लाभ मिळत असल्याने कार्यक्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे. रिक्त पदे असतानाही कुटुंब शस्त्रक्रियेत आरोग्य केंद्राने नांदेड जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला.

परंतु रिक्त पदासह, अत्यंत आवश्यक असलेले शवविच्छेदन साहित्य व स्वतंत्र पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णासह अधिकारी कर्मचारी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जिल्हा आरोग्य विभागाच्या आदेशानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ता.१८ रोजी तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रात लाप्रोस्कोपीक नांदेड येथील सुप्रसिध्द सर्जन डॉ. बोले यांच्या उपस्थितीत तालुक्यातील आरोग्य अधिकारी यांच्या मदतीने कुटुंब शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये कोळी येथे सर्वाधिक महीलांची कुटुंब शस्त्रक्रिया करण्यात आली.

तर बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांची शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात आले. विद्युत उपकेंद्राच्या समोरासमोर असलेल्या आरोग्य उपकेंद्रात स्वतंत्र डि.पी. असताना काही दिवस स्वतंत्र पुरवठा केला होता. तो सध्या बंद करून गावासह परीसरातील गावाचा विद्युत पुरवठा जोडला असल्याने पिंपरखेड येथे खंडीत झालेल्या विज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामासाठी व आरोग्य केंद्रातील डि.पी. वर किरकोळ कामासाठी सुरू असलेल्या ३६ महिलांच्या कुटुंब शस्त्रक्रियेला अडथळा आला असल्याने रुग्णांसह अधिकारी व कर्मचारी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

शेवटी विद्युत कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मदतीने विद्युत पुरवठा सुरळीत करावा लागला. अती संवेदनशील असलेल्या बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमी रुग्णांची संख्या वाढत असताना रात्री बेरात्री रुग्णांना येथील बहुचर्चित विज पुरवठ्यामुळे उपचारासाठी हदगावजवळ करावे लागत असल्याने स्वतंत्र विद्युत पुरवठा मागणी करुनही मिळत नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे. याकडे लोकप्रतिनिधी सह संबंधित विभागाने लक्ष देऊन स्वतंत्र विज पुरवठा करुन द्यावा अशी मागणी केली जात आहे.

गावासह परीसरातील गावासोबत आम्हाला सुरू असलेल्या विद्युत पुरवठा खंडित झाल्यास सुरळीत होईपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आम्हाला स्वतंत्र विद्युत पुरवठा करण्यासाठी आम्ही संबंधित विभागाकडे कळविले आहे. कुटुंब शस्त्रक्रिया सुरू असतानाच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

- डॉ. एस.जी. भिसे, वैद्यकीय अधिकारी बरडशेवाळा.

खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कमी कर्मचाऱ्यांवर काम करत असताना अडचणी येत आहेत. बरडशेवाळा गावासह प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वतंत्र पुरवठा करण्यासाठी आम्ही वरिष्ठ विभागाला कळविले असून लवकरच पुढील गावे वेगळी जोडली जाणार आहे.

- प्रदिप नरनवरे, कनिष्ठ अभियंता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT