नांदेड : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाय योजनेअंतर्गत गुरुद्वारा लंगर साहिब मधील सर्व यात्रेकरूंचे नावे, पत्ता, त्याच्या आधार क्रमांक, मोबाईल नंबर देण्याची मागणी नांदेडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी लंगर साहिबचे संतबाबा बलविंदरसिंघजी महाराज तसेच बाबा मास्टरसिंघ महाराज यांच्याकडे बुधवारी (ता. सहा) केली आहे.
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांची गुरुव्दारा भेट
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी निर्गमित आदेशानुसार व कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केलेल्या गुरुद्वारा परिसरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तपशीलवार धोरण व करावयाचे उपाय योजनांची अंमलबजावणी याबाबत आरोग्य विभागाने विहित करून दिलेली कार्यपद्धती राबविण्याबाबत बुधवारी (ता. सात) स्थळ पाहणी करून जिल्हाधिकारी डॉ. विपीन, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केलेल्या चर्चेनुसार गुरुद्वारा लंगर साहिबकडे निवेदन देण्यात आले आहे
हेही वाचा.....खरिपात कापूस लागवड घटणार.....कुठे ते वाचा
गुरुद्वारा लंगर साहिब मधील यात्रकरुंची नावे द्यावी
गुरुद्वारा लंगर साहिबमध्ये सर्व यात्रेकरुंची नावे व त्यांचा पत्ता, आधार क्रमांक, आधार क्रमांकाची छायांकित प्रत, मोबाईल क्रमांक, खोली क्रमांक निहाय यादी तत्काळ देण्याची मागणी केली आहे. या सोबतच सर्व यात्रेकरूंना सुरक्षीत अंतराचे पालन होईल या पद्धतीने नवीन यात्रेकरूंच्या रूममध्ये हलवण्याबाबत कारवाई करण्यात यावी, यात्रेकरूंच्या नाश्त्याची व जेवण्याची सोय एकत्रितपणे हॉलमध्ये न करता ते वास्तव्यास असलेल्या रूममध्येच करण्याची व्यवस्था करावी, यात्रेकरूंना जेवण पुरविणाऱ्या सेवेकऱ्यांनी जेवण वाढताना आवश्यक ती वैद्यकीय साधनांचा वापर करण्याची खबरदारी घ्यावी.
हेही वाचलेच पाहिजे....कारागीर व भूमिहीन मजुरांचे प्रश्न कायम, कसे? ते वाचाच
मजूर व कामगारांची संख्या भरपूर
गुरुद्वारा लंगर साहिब परिसरात वास्तव्यास असलेल्या मजूर व कामगारांची संख्या भरपूर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, आधार क्रमांकाची छायांकित प्रत, मोबाईल क्रमांक, खोली निहाय यादी उपविभागीय कार्यालयास सादर करण्याची मागणी केली आहे. तसेच मजूर व कामगार लोकांना स्थळ पाहणी दरम्यान दिलेल्या सक्षम सूचनांप्रमाणे इमारतीमध्ये हलविण्यात यावे. गुरुद्वारा परिसरात कार्यरत सर्व सेवेकरी त्यांचे नाव, त्यांचा पत्ता, आधार क्रमांक व आधार क्रमांकाची छायांकित प्रत, मोबाईल क्रमांक आदीची खोली निहाय यादी उपविभागीय कार्यालयात सादर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था भरलेले इमारतीमध्ये नियमाचे पालन होईल, या पद्धतीने करण्यात यावी. गुरुद्वारा लंगर साहिब गुरुद्वारामध्ये कार्यरत सेवेकऱ्यापैकी वीस सेवेकरी पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आपण त्याच्या संपर्कात आले आहात. त्यामुळे आपलीही तपासणी आवश्यक असल्याचे विनेदनात म्हटले आहे.
तहसिलदार, पोलिस निरीक्षकावर जबाबदारी
सदरील बाबींची पूर्तता करण्यात येत आहे किंवा नाही याची खात्री नांदेड तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड, वजिराबाद पाेलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी यांनी करावी. तसा अहवाल गुरुवारी (ता. सात) दुपारी बारा वाजेपर्यंत सादर करावा असे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी आदेशित केले आहे. ही कारवाई अनुसरण्यात न आल्यास व माहिती उपलब्ध करून देण्यात कसूर केल्यास कोरोना सारख्या साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी शासन करीत असलेल्या उपाययोजनांमध्ये आपण अडथळा निर्माण केल्या सारखे होणार असून त्यामुळे एकंदरीत सर्वसामान्य जनतेशी या विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वर नमूद करण्यात आलेली यादी निहाय माहिती व आपल्या दोघांचे स्वॉब तपासणीसाठी तत्काळ उपलब्ध करुन देण्यात निवेदन लतिफ पठाण यांनी दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.