File photo 
नांदेड

रक्षाबंधनदिन विशेष : बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन

प्रमोद चौधरी

नांदेड : बहिण भावाच्या प्रेमाचे बंधन म्हणजे रक्षाबंधन. सोमवारी (ता.तीन आॅगस्ट) हा सण सर्वत्र आनंदाने साजरा होत आहे. परंतु, अलिकडे बहिणींवर होत असलेले अत्याचार यापुढे होणार नाहीत, अशी प्रतिज्ञा सर्व भावांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निःस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे.

जिथे पूजा, तिथे सन्मान
स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणाऱ्या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.

भावांना समजावून सांगण्याची गरज
रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण! बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणाऱ्या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. मात्र आज तिची मस्करी करणाऱ्‍या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणाऱ्या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे.

असे आहे टिळ्याचे महत्त्व
बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणाऱ्या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणाऱ्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो.

बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक
‘श्रावण’ नक्षत्रात बांधले जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहेत. पौराणिक काळात पत्नी पतीच्या सौभाग्यासाठी रक्षासूत्र बांधत असे. मा‍त्र, परंपरेत बदल घडून बहिण-भाऊ यांच्यातील निस्सिम प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. 
- प्रा. सुरेखा वामन कुलकर्णी, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी रोहित शर्माच्या जागी असतो, तर पर्थ कसोटी खेळण्यासाठी पोहोचलो असतो', Sourav Ganguly च्या विधानाची चर्चा

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

कऱ्हाड उत्तर-दक्षिण मतदारसंघांत आघाडी धर्म? पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील एकाच व्यासपीठावर; दोन्ही गटांनी घेतलं जुळवून!

Election Voting : मतदान कार्ड नाहीये? चिंता कशाला, या 12 पैकी कोणत्याही ओळखपत्रांद्वारे करा मतदान

विद्या नाही , माधुरी नाही तर 'ही' आहे खरी मंजुलिका ; बिहाइंड द सीन व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT