राणी भोंडवे पीएसआय 
नांदेड

भोकरमध्ये राणी भोंडवेंची धडाकेबाज कारवाई; अवैध गुटखा जप्त

भोकर शहरातील आंबेडकर चौक परिसरात राज्य शासनाने बंदी घातलेला विविध कंपन्यांचा गुटखा सर्रास विक्री केला जातो. अशा तक्रारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे आणि पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्या.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : भोकर शहरात व तालुक्यात (Bhokar) अवैध धंदे जोमात सुरु असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राणी भोंडवे (Psi Rani bhondve) यांनी केलेल्या कारवाईत बंदी असलेल्या अवैध गुटख्याचा साठा जप्त केला. यावेळी त्यांनी संबंधीत दुकानचालकाविरुद्ध भोकर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (ता. २१) शहरातील आंबेडकर चौक भागात केली. (Rani- Bhondwe's- action- in- Bhokar- Illegal- gutka- confiscated)

याबाबत अधिक माहिती अशी की, भोकर शहरातील आंबेडकर चौक परिसरात राज्य शासनाने बंदी घातलेला विविध कंपन्यांचा गुटखा सर्रास विक्री केला जातो. अशा तक्रारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे आणि पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्या. यावरुन या अवैध धंद्याविरुद्ध धडक कारवाई करण्याचे आदेश फौजदार राणी भोंडवे यांना दिले. यावरुन त्यांनी गुप्त माहिती काढली. राणी भोंडवे यांनी आपले सहकारी ज्ञानेश्वर सरोदे, प्रमोद जोंधळे यांना सोबत घेऊन खासगी वाहनाद्वारे त्या आंबेडकर चौकात पोहचल्या.

हेही वाचा - RBI आपल्या खजिन्यातील 99122 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम केंद्रसरकारकडे वर्ग करणार आहे

येथील शेख रज्जाक शेख हबीब यांच्या मालकीच्या के. जी. एन. दुकानावर छापा टाकला. पोलिस आपल्यावर कारवाई करणार याची माहिती मिळताच जुकानचालक पसार झाला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दोघांना आम्ही पोलिस आहो असे सांगून दुकानाची पंचासमक्ष झडती घतली. यावेळी दुकानात प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ साठा आढळून आला. याबद्दल माहिती घेतली असता संबंधीत व्यक्तीने मला काही माहिती नसल्याचे सांगितले.

या कारवाईत पोलिसांनी मुसाफिर पान मसाला, राज निवास पान मसाला, सागर गुटखा, आर. के., एक्स. एल. जाफरानी जर्दा, आर्यन डी. जे., एस. आर. आय. तंबाखू, बजाज तंबाखू असा एकूण बावीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आंबेडकर चौक भोकर येथील केजीएन दुकानदार शेख रज्‍जाक शेख हबीब याच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी व महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेल्या सामान्य जनतेच्या आरोग्याला धोका असलेला गुटखा व पानमसाला विक्री करण्याच्या उद्देशाने प्रतिबंधित वस्तूचे सेवन केल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो हे माहीत असताना स्वतःच्या ताब्यात बाळगताना मिळून आला. म्हणून त्याच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरुन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अन्य अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे.

येथे क्लिक करा - गडचिरोली पोलिस स्मृतिदिनीच पोलिसांनी घेतला बदला. नक्षलवादी चकमकप्रकरणी सी-४७ अलर्ट- पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT