Nanded  sakal
नांदेड

Nanded : कचरा संकलनावर नियंत्रणासाठी ‘स्कॅनिफाई’ प्रणाली;महापालिकेकडून शहरातील १ लाख ३६ हजार घरांवर लावण्यात येणार स्कॅन कोड

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : घंटागाडीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा संकलन केला जातो. मात्र, परिसरात आणि घराजवळील कचरा उचलला जात नाही, अशी ओरड असते. त्यामुळे कचरा संकलन करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नांदेडमध्ये मनपाच्यावतीने ‘स्कॅनिफाई’ कोड प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत प्रत्येक घरावर स्कॅन कोडची पाटी लावली जात आहे. यात शहरातील जवळपास १ लाख ३६ हजार घरांवर स्कॅन कोड लावले जाणार आहेत. घराजवळील कचरा संकलन करण्यात आला की नाही, हे स्कॅनद्वारे समजणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरात आणि घरामध्ये जो कचरा संकलित केला जातो, त्यामध्ये कचरा संकलन आणि मॉनिटरिंग करण्यासाठी मनपाकडे कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे कचरा साचलेला दिसत असल्यामुळे गोळा केला किंवा नाही, हेही नागरिकांना माहीत होत नव्हते. सध्या शहरात कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. त्याला उपाय म्हणून कचऱ्यावर आयसीटी बेस्ट मॉनिटरिंग सिस्टम मनपाकडून उपलब्ध करण्यात आली आहे. यात नागरिकांच्या घरी क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. त्या कोडमध्ये घंटागाडी कर्मचारी घरातील कचरा संकलित करत असताना क्यूआर कोड स्कॅन करणार आहे.

त्यामुळे घरातील कचरा जमा झाला आहे, हे मनपाच्या स्वच्छता विभागाला सिस्टमद्वारे कळणार आहे. यामुळे चांगल्या पद्धतीने कचऱ्याचे व्यवस्थापन होणार आहे. जास्तीत-जास्त कचरा घरातून उचलला जाणार आहे. त्यासोबतच नागरिकांना घंटागाडी किती वेळात येऊ शकेल? किंवा कुठपर्यंत आहे, याचीही माहिती ॲपद्वारे मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना कचरा देण्यासाठी तयार राहता येईल. त्यासोबतच त्यांचा वेळ वाचणार आहे, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

नागरिकांनी सहकार्य करावे

मनपाच्या एजन्सीमार्फत हे क्यूआर कोड लावण्यात येत आहेत. घरातील कचरा संकलन हाच त्यांचा उद्देश आहे. याव्यतिरिक्त महापालिका कोणतीही माहिती गोळा करत नाही. आपल्या घराला क्यूआर कोड लावण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.

३०० टन कचऱ्याचे होते रोज संकलन

नांदेड शहारात महापालिकेच्या ११३ घंटागाड्या आहेत. महापालिकेअंर्तगत येणाऱ्या सहा विभागांतून रोज ८८९ कर्मचारी ३०० टन कचऱ्याचे संकलन करतात. या नव्या प्रणालीमुळे यात आणखी वाढ होणार असून, शहर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे, असे स्वच्छता विभागाचे सादिक यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT