file photo 
नांदेड

....म्हणून कर्जमाफीचे पोर्टल केले बंद

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या कचाट्यात अडकली आहे. जिल्ह्यातील पात्र दोन लाख ४ हजार १९१ कर्जखात्यापैकी एक लाख ६३ हजार ९० खात्यांची यादी पोर्टलवर टाकण्यात आली. यानंतर शेतकऱ्यांना बायोमेट्रीक मशीनवर अंगठा लावल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे वर्ग होतात. परंतु यासाठी गर्दी होइल, या शंकेने शासनाने ते पोर्टलच बंद केले आहे. यामुळे कर्जमाफीसह पिककर्ज वाटपाचे कामही लांबल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत आले आहेत. 

दोन लाख १४ हजार ४९१ शेतकरी पात्र
राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील दोन लाख १४ हजार ४९१ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी एक हजार ४६१ कोटी ३६ लाख लागतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. पात्र खात्यांपैकी दोन लाख १२ हजार ७५१ खाते आधार लिंक केले आहेत. तर त्यापैकी एक लाख ९५ हजार खाते पोर्टलवर अपलोड केले आहेत. तर यातील एक लाख ६३ हजार ९० खातेदारांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध झाली. 

गर्दीच्या शक्यतेने पोर्टल केले बंद
पोर्टलवर अंगठा लावण्यासाठी कर्जखात्यांची क लाख ६३ हजार ९० खातेदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर संबधीत शेतकऱ्याने बॅंकेत जावून बायोमेट्रीक मशीनवर अंगठा लावल्यानंतर अशा खात्यावर शासनाकडून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाते. परंतु सध्या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी लॉकडाउन सुरु आहे. अशा काळात एकाचवेळी पाच पेक्षा अधीक नागरिकांना एकत्र येता येत नाही. अशा काळात याद्या प्रसिद्ध केल्यातर गर्दी होइल, या शक्यतने शासनाकडून तूर्तास पोर्टल बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी दिली.  

३६४ खात्यावर दोन कोटी ४७ लाख जमा
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र दोन लाख १४ हजार ४९१ खात्यांपैकी दोन लाख १२ हजार ७५९ खात्यांचे आधारलिंक झाले आहेत. तर एक लाख ९५ हजार ८९२ खाते पोर्टलवर डाटा अपलोडचे काम झाले आहे. यापैकी प्रायोगीक तत्वावर निवडलेल्या दोन गावातील ३६४ खात्यावर दोन कोटी ४७ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. 

पिककर्ज वाटप रखडले 
कर्जमाफी योजना लॉकडाउनच्या कचाट्यात अडकल्याने खरीप हंगामासाठीचे पिककर्ज रखडले आहे. कर्जमाफी झाल्यानंतर बॅंकांना पुन्हा त्याच खातेदारांना नव्याने कर्ज देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु सध्या कर्जमाफी कोरोनाच्या कचाट्यात अडकल्याने पिककर्ज वाटपही रखडण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्ह्यात चालूबाकीदार तसेच नवीन खातेदारांना पिककर्ज वाटप करण्याचे काम सुरु असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी दिली.  

गर्दीच्या शक्यतेने पोर्टल केले बंद
जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरलेल्या दोन १४ हजार ४९१ खातेदारापैकी एक लाख ६३ हजार ९० खातेदारांची यादी पोर्टल प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु लॉकडाउनच्या काळात गर्दी होइल, अशा शक्यतेने ते पोर्टल तुर्तास बंद केले आहे. 
- प्रवीण फडणीस, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT