file photo 
नांदेड

Video : ‘मदर्स डे’ : आईसाठी मुलाने मॉरेशिसमधून असे गायले गाणे...

शिवचरण वावळे

नांदेड : आज मदर्स ‘डे’ वर्षातून एकदा येणाऱ्या या दिवशी आईच्या काळजाच्या तुकड्याला ‘आई’ची आठवण येणे स्वाभाविक आहे. सध्या लॉकडाउनमध्ये देशासह विदेशात शेकडो भारतीय विद्यार्थी अडकुन पडले आहेत. प्रत्येकास घरी जाण्याची ओढ लागली आहे.

घरच्यांना देखील बाहेर देशात अडकुन पडलेल्या मुलांची चिंता वाटत आहे. परंतु, सध्यातरी चिंता करुन उपयोग नाही. कारण संपूर्ण जग ‘कोरोना’ने व्यापून टाकले आहे. नांदेड शहरातील सहा विद्यार्थी मॉरेशिस येथे अडकुन पडले आहेत. ‘मदर्स डे’ निमित्त ऋतुज माने या विद्यार्थ्याने मदर्स डे स्पेशल गाने गाउन आईला खुप मिस केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येते. त्यांचा हा व्हिडीओ ई-‘सकाळ’ने वाचकांसाठी उपलब्ध करुन दिला आहे.  

हॉटेल मॅनेजमेंट इंटर्नशिप कोर्स करण्यासाठी नांदेडचे सहा विद्यार्थी २८ नोव्हेंबरला मॉरेशिसमध्ये गेले. मार्च २०२० मध्ये त्यांची इंटर्नशिप पूर्ण होणार म्हणून त्यांनी २४ मार्चला नांदेडचे परतीचे तिकीट सुद्धा बुक करुन ठेवले होतो. मात्र, मायदेशी परतण्यापूर्वीच (ता.२२) मार्चला मध्यरात्रीपासून सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधा बंद करण्यात आल्या. दरम्यान, काही देशातील विद्यार्थी कसे बसे मायदेशी परतले. परंतु, मॉरेशिसमध्ये अडकुन पडलेल्या या विद्यार्थ्यांकडे कुणाचे लक्ष गेले नाही. त्यामुळे ही मुले आजही लॉकडाउनमुळे तिथेच अडकुन पडले आहेत. 

मॉरेशिस देशात ऋतुज मानेचा मदर्स ‘डे’
मदर्स ‘डे’ च्या दिवशी त्यांनी आईला खुप मिस केले. आईच्या आठवणीत भन्नाट गाने गाऊन आईची आठवण देखील केली आहे. लॉकडाउनच्या काळत देखील त्या सहा जणांना त्यांच्या आई शिवाय सारखा धीर देणारा दुसरा कुणीच वाटत नाही. मॉरेशिसमध्ये अडकुन पडलेल्या या विद्यार्थ्यांना घरची ओढ लागली आहे. लॉकडाउन कधी उठते आणि घरी कधी एखदा घरी जाउ अशी अवस्था या विद्यार्थ्यांची झाली आहे. लॉकडाउनचे ४५ दिवस झाली. त्यामुळे सर्वच मुले खुप तणावाखाली आहेत. अशा या तणावात त्यांना आईची आठवण होते. म्हणून यातील ऋतुज माने या २० वर्षाच्या मुलाने आईला एक खास गाने डेडीकेट केले आहे. 
 

मनावरचे दडपण कमी करण्याचा प्रयत्न
लॉकडाउनमुळे मनावत दडपण आहे. मनावरचे दडपण झटकुन ‘मदर्स डे’ ला आईची खुप आठवण येत होती. त्यामुळे साथीला असलेला मोबाईलच्या मदतीने आईसाठी खास गाणे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला सर्वांना घरी लवकर जाण्याची खुप उत्सुक्ता आहे. त्यासाठी राज्य सासनाने आम्हाला घरी सोडण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आमची इच्छा आहे.
- ऋतुज माने 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2024

Panchang 16 November: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे

Child Marriage: अल्पवयीन पत्नीसोबत लैंगिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

Mumbai Local Mega Block: रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

SCROLL FOR NEXT