नांदेड : जिल्ह्यात सोयाबीन पेरल्यानंतर ते उगवत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. याबाबत तालुकास्तरीय समितीच्या पंचनाम्यात सर्वाधीक ठिकाणी सदोष सोयाबीन बियाणांमुळे उगवण झाली नसल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. आजपर्यंत दोन हजार १०७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर ८१२ ठिकाणी समितीकडून तपासणी करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरणी
जिल्ह्यात यंदा सर्वाधिक चार लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणीचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केल्यामुळे बियाणे महामंडळासह खासगी कंपन्यांकडून सोयाबीनच्या विविध वाणाचे बियाणे बाजारात उपलब्ध झाले होते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व कामे आटोपून सोयाबीन बियाणे तसेच खताची खरेदी केली. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत बियाण्याचे दर प्रति बॅग सातशे ते एक हजार पर्यंत अधीषक होते. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणांची खरेदी केली.
पावसामुळे पेरणीला केला प्रारंभ
ता. ११ जून रोजी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला. नंतर आठ दिवसाच्या कालावधी होऊनही बियाणे उगवत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागासह राजकीय-सामाजिक संघटनेकडे धाव घेऊन तक्रार केली. यावेळी त्यांनी जमिनीत ओलावा होता तसेच बियाणेही योग्य प्रमाणात पेरले परंतु ते निघाले नसल्याच्या तक्रारी केल्या. यात सोयाबीन बियाणांमध्ये दोष असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या. याबाबत जिल्हा प्रशासनानेही कृषी विभागाला तक्रार प्राप्त झालेल्या ठिकाणी तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून पाहणी करून पंचनामा करण्याचे निर्देश दिले होते.
हेही वाचलेच पाहिजे.....एक लाख ६६ हजारांचा ऐवज पळविला
जिल्ह्यात दोन हजार १०७ तक्रारी
आजपर्यंत जिल्ह्यात दोन हजार १०७ तक्रारी विविध तालुक्याच्या ठिकाणी प्राप्त झाल्या आहेत. यात सर्वाधिक तक्रारी धर्माबाद तालुक्यातून ५३८ प्राप्त झाल्याची माहिती मिळाली. या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून कृषी शास्त्रज्ञाचा समावेश असलेल्या समितीकडून प्रत्यक्ष शेतीत जाऊन पाहणी केली. या पाहणीत सर्वाधिक ठिकाणी सोयाबीन अभियानामध्ये दोष असल्याचे आढळून आले.
जिल्हाधिकाऱ्यांपूढे अहवाल सादर होणार
समितीचा अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांच्यापुढे सादर करण्यात येणार आहेत. यानंतर शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाइबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले. काही ठिकाणी बियाणे कंपनी स्तरावरून शेतकऱ्यांना बियाणे पुन्हा उपलब्ध करून देण्यात आले आहे. एक-दोन दिवसात अंतिम अहवाल कृषी विभागाकडून कळविण्यात येइल.
अधिक पर्जन्यमानाच्या काळात अडचण
जिल्ह्यात यापूर्वीही ज्या काळात पर्जन्यमान जास्त झाले, त्यावेळी बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या २००८ - २००९, २०१४ -१५ मध्ये बियाणांची तक्रार आली होती. यानंतर २०२० -२१ मध्येही अशा तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.