file photo 
नांदेड

विशेष बातमी : कंधारच्या भुईकोट किल्ल्याची झाली दुरावस्था; पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष, झाडा- झुडपांचा किल्ल्याला वेढा

हफीज घडीवाला

कंधार (जिल्हा नांदेड) ः ऐतिहासिक ठेवा जतन करताना संबंधित विभागाने सतर्क राहणे अत्यंत गरजेचे असते. याकडे दुर्लक्ष झाल्यास त्या वास्तूचा बोजवारा उडतो. अगदी असेच चित्र सद्या कंधारमधील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे झाले आहे. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील भुईकोट किल्ल्याची पुरती दुरवस्था झाली आहे. संपूर्ण किल्ल्याला झाडाझुडपांचा वेढा पडला असून पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे ऐतिहासिक ठेवा इतिहासजमा होईल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या दहा पंधरा वर्षात किल्ला जतन, संवर्धन आणि सुशोभिकरणावर जवळपास पंधरा कोटी रुपय खर्च करण्यात आले आहेत. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम झाल्याचे दिसत नाही. जुन्या वास्तूंना झळाळी मिळाली एवढच. पर्यटकांच्या समस्यात मात्र घाट झाली नाही. कोट्यवधी खर्चूनही किल्ल्याचा बाह्यरुप आहे तसाच आहे. यावरून पुरातत्व विभागाला किल्ल्याचे गांभीर्य नसल्याचे उघड होत आहे.

झाडाझुडपांनी किल्ल्याला वेढा दिला 

राष्ट्रकूट राजांच्या काळात जवळपास बाराशे वर्षापूर्वी कंधारमध्ये भुईकोट किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. या किल्ल्याचा विस्तार २४ एकरात आहे. कोट्यवधी रुपयांचा मोबदल्यात मोडकळीस आलेल्या वास्तू बोलक्या झाल्या. पण किल्ल्याचे बाह्यरुप मात्र आहे तसेच आहे. बुरुजांची डागडुजी करण्यात आली एवढच. सद्या झाडाझुडपांनी किल्ल्याला वेढा दिला आहे. खंदकात परिसरातील गटाराचे पाणी सोडले जात आहे. याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या ऐतिहासिक वास्तूला ‘कोणी वाली आहे की नाही’असा प्रश्न उपस्थित होत आहे.

किल्ल्याला दरवर्षी लाखाच्यावर पर्यटक भेट देतात

कंधारचा हा ऐतिहासिक किल्ला मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. किल्यातील बारादरी, लालमहाल, राणीमहाल, शिसमहाल, राजबागस्वार, अंबरखाना, प्रवेशद्वार, भुयारीमार्ग पर्यटकांना आकर्षित करतात. किल्ल्याला दरवर्षी लाखाच्यावर पर्यटक भेट देतात. यात मोठ्याप्रमाणात शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असतो. किल्ल्याची भेट घेऊन झाल्यावर किल्ल्याची दुरवस्था नजरेत पडते. किल्ल्याचा संपूर्ण बाह्यभाग झाडाझुडपांनी वेढलेला दृष्टीत पडताच पर्यटक व शालेय विद्यार्थ्यांत उदासीनता पसरते. कोरोनामुळे गेल्या एक वर्षांपासून किल्ला बंद ठेवण्यात आल्याने किल्ल्याच्या दुरावस्थेत मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज 

कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या एक वर्षांपासून किल्ल्याला टाळे ठोकण्यात आले. हा निर्णय बरोबर आहे की चूक आहे, हा संशोधनाचा विषय असला तरी या निर्णयाचा अर्थ पुरातत्व विभागाने किल्ल्याकडे दुर्लक्ष करावे असा होत नाही. पण पुरातत्व विभागाचे याकडे चक्क दुर्लक्ष झाले आहे. संपूर्ण किल्ला झाडाझुडपांनी वेढला गेला आहे. किल्ला बंद आहे म्हणून झाडेझुडपे काढण्यास मनाई आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन किल्ल्याला झाडाझुडपांपासून मुक्ती द्यावी. आणि पर्यटकांसाठी किल्ला उघडावा, अशी मागणी होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT