बहाद्दरपुरातील मन्याडवरील पूल बनला धोकादायक  sakal
नांदेड

नांदेड : बहाद्दरपुरातील मन्याडवरील पूल बनला धोकादायक

कठडे तुटून गेल्याने अपघाताची शक्यता; सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावे लक्ष

हफीज घडीवाला

कंधार : बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील मन्याड नदीवरील पुलाचे कठडे तुटून गेल्याने या पुलावर अपघातांची शक्यता वाढली आहे. एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन तत्काळ कठडे बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.

माजी खासदार डॉ. केशवराव धोंडगे आणि माजी आमदार गुरुनाथ कुरुडे यांच्या प्रयत्नातून तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांच्या काळात बहाद्दरपुरा जवळील मन्याड पात्रावर पुलाला मंजुरी मिळाली होती. उदगीर, मुखेड, जळकोट, नरसी या शहरासोबतच तालुक्यातील विविध गाव वाडीतांड्याना जोडणारा हा पूल आहे. हा पूल निर्माण होऊन ४५ वर्षाचा कालावधी लोटला आहे. मागील काही वर्षांपासून या पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, हे दुर्लक्ष जनतेच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

हा पूल सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. पुलावरील अनेक ठिकाणचे कठडे एक तर तुटून गेले किंवा चोरून नेण्यात आले आहेत. रस्ताही उखडून गेला आहे. पुलावरील विजेचे खांब शोभेच्या वस्तू बनले आहेत. यामुळे पुलावर रात्रीच्या वेळी वाहने चालवणे जिकरीचे झाले आहे. यंदा जोरदार पर्जनवृष्टी झाल्याने मन्याडीला पूर आला होता. पुलावरून पाणी वाहिले होते. सद्या पुलाला समांतर पाणी आहे. अशा वेळी रात्रीच्या वेळी अंधारात पुलाचा अंदाज न येऊन वाहन नदीत पडण्याची शक्यता आहे. असा अपघात आजपर्यंत झाला नसला तरी पुढे होणार नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. अशी घटना घडावी, माणसे मरावीत, याची सार्वजनिक बांधकाम विभाग वाट पाहत आहे का? असा प्रश्नही वाहनधारकांनी उपस्थित केला आहे. अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्यापेक्षा अपघात होऊ नये याची काळजी घेवून पुलावर कठडे, पथदिवे बसवले तर जीवीतहानी टाळता येऊ शकते. पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करणे महत्वाचे आहे. बांधकाम विभागाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

आमदारांनी घालावे लक्ष

बहाद्दरपुरा येथील पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यायला बांधकाम विभागाकडे वेळ नाही किंवा ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत. काहीही असले तरी यामुळे आज पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली, हे मात्र खरे आहे. एखादी अप्रिय घटना घडण्यापूर्वी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घालून पुलाची दुरुस्ती करून घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT