Nanded News esakal
नांदेड

त्रिपुरातील घटनेचा नांदेडमध्ये पडसाद,विविध भागांत दगडफेक करत तोडफोड

जमावाने देगलूर नाका, शिवाजीनगर, कलामंदिर, पावडेवाडी नाक्यासह अनेक ठिकाणी दगडफेक करत चारचाकी वाहने, दुकान, वाईनमार्ट, स्वीटमार्ट आदींची तोडफोड करत दहशत निर्माण केली होती.

प्रमोद चौधरी

नांदेड : त्रिपुरा (Tripura Violence) येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने शुक्रवारी (ता.१२) बंद ठेवली होती. दुपारी जमावाने देगलूर नाका, शिवाजीनगर, कलामंदिर, पावडेवाडी नाक्यासह अनेक ठिकाणी दगडफेक करत चारचाकी वाहने, दुकान, वाईनमार्ट, स्वीटमार्ट आदींची तोडफोड करत दहशत निर्माण केली होती. त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ (Nanded) मुस्लीम समाजाने शुक्रवारी बंद पुकारला. दरम्यान दुपारी अडीच वाजताच्या सुमारास काही जमावाने शिवाजीनगर भागातील मुख्य मार्गालगत असलेल्या दुकानावर दगडफेक केली. या दगडफेकीत चारचाकी वाहनाचे समोरील काच फोडून जमावाने नुकसान केले. त्याचप्रमाणे दुचाकीचेही (एमएच २६ बीके ६५८९) नुकसान केले. शिवाजीनगर भागात असलेल्या छप्पनभोग स्वीटस या दुकानात घुसून जमावाने दुकानातील काचा फोडून साहित्याची नासधूस केली. (Nanded Latest News)

यामध्ये शेजारी असलेले शैलेश बच्चेवार यांच्या गुरुकृपा ट्रेडर्स या दुकानातीलही साहित्य रस्त्यावर फेकून दिले. दगडफेकीची घटना घडताच शिवाजीनगर परिसरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने तत्काळ बंद केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, शिवाजीनगर ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक श्री. धबडगे, सहायक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे हे पोलिसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. या शिवाय देगलूर नाका येथे मुस्लिम बांधवांनी निषेध सभा घेऊन त्रिपुरासरकारचे निषेध करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान जमावाने देगलूर नाका भागातील एका देशी दुकानावर हल्ला करत बॉक्समधील बाटल्या रस्त्या फोडल्या. तसेच एक दुचाकीही जाळली. पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी येथे अश्रू धुराचा वापर करावा लागला. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन देगलूर नाका भागातील परिस्थिती नियंत्रणात आणली.

दोषींवर कडक कारवाई करावी

त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर झालेला हल्ला तसेच प्रेषित मोहम्मद यांच्यावर चुकीचा शब्दप्रयोग केल्याचे पडसाद शुक्रवारी नांदेडमध्येही उमटले. देगलूर नाका येथे मुस्लिम समाजबांधवांनी एकत्रित येऊन त्रिपुरा सरकारचा निषेध केला. तसेच केंद्र सरकारने दोषींवर कडक कारवाई करून कठोर शिक्षा करण्याचीही मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजाराचा मूड बदलला; आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Latest Maharashtra News Updates : फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल?

Nagraj Manjule : खाशाबा जाधवांवरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नागराज मंजुळेंविरोधात समन्स

Mumbai: दारु पडली महागात; तीन तरुणांचा मृत्यू, वाचा नक्की काय घडलं?

Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

SCROLL FOR NEXT