अवकाळी पाऊस.jpg 
नांदेड

अवेळी पावसाने पुन्हा झोडपले......कुठे ते वाचा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्ह्यात ठराविक दिवसानंतर अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. या पावसामुळे उन्हाळी पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे लॉकडाउनमध्ये अडचणीत असलेले शेतकररी दुहेरी संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. आठ) सकाळी आठपर्यंत एकूण ८०.२८ मिलीमीटर तर सरासरी ५.०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

ठराविक कालावधीनंतर अवकाळी
जिल्ह्यात ठराविक कालावधीनंतर अवकाळी पावसाचे आगमन होत आहे. हा पाऊस सर्वच तालुक्यात होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिके, भाजीपाला तसेच फळपिकांची हानी होत आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणखी गंभीर होत आहेत. गुरुवारी (ता. सात) रात्री जिल्ह्यातील अनेक मंडळात पावसाचे आगमन झाले. 

काही भागात अवकाळीचा जोर
अवकाळी पाऊस देगलुर, उमरी, कंधार, भोकर व बिलोली या तालुक्यात बऱ्यापैकी झाला. तर इतर तालुक्यातही पावसाने हजेरी लावल. या पावसामुळे तापमानाचा पारा काही अंशी खाली आला असला तरी शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसत आहे. या पावसामुळे शेतकरी पेरणी पूर्व कामाच्या तयारीला लागतील असा अंदाज आहे.

मंडळनिहाय झालेला पाऊस
उमरी १६, सिंधी दोन, गोळेगाव चार, देगलूर सहा, खानापूर पाच, शहापूर १७, मरखेल सात, माळेगाव सहा, उस्माननगर १२, बारूळ सात, पेठवडज १३, भोकर व किनी प्रत्येकी दोन, मोघाळी २०, मुदखेड सात, बारड सात, मुगट आठ, मनाठा दहा, निवघा तीन, आष्टी १५, धर्माबाद तीन, करखेली तीन, सरसम एक, आदमपूर ३२, लोहगाव पाच, सगरोळी पाच, कुंडलवाडी ३०, इस्लापूर चार, मुखेड दहा, येवती पाच, जाहूर चार, मुक्रमाबाद दोन, बाऱ्हाळी दोन, मांजरम दोन, बरबडा चार, कुंटूर चार. असा एकूण ८०.२८ मिलिमीटर तर सरासरी ५.०२ मिलिमीटर पाऊस झाला.

तालुकानिहाय झालेला सरासरी पाऊस (मिलीमीटरमध्ये)
उमरी ७.३३, देगलूर सात, भोकर सहा, मुदखेड ७.३, हदगाव पाच, धर्माबाद ३.३३, हिमायतनगर ०.३४, बिलोली १४.७५, किनवट ०.५७, मुखेड ३.२९, नायगाव दोन. लोहा व अर्धापूर तालुक्यात पाऊस निरंक.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : मराठी माणसांचे दोन पक्ष तोडण्याचे काम भाजपाने केले - जयंत पाटील

SCROLL FOR NEXT