file photo 
नांदेड

जिल्ह्यात लवकरच अद्ययावत रुग्‍णालय......कुठे ते वाचा 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्‍ह्यातील कोरोनाची परिस्थिती आज आटोक्‍यात असली तरी भविष्‍यात नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यादृष्टिने जिल्‍हा पातळीवर शक्‍य त्‍या उपाययोजना करण्‍याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्‍हाण यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले. जिल्‍ह्यातील सर्व विभागांच्‍या नियोजन व पुढील कामांच्‍या दिशासंदर्भात मुबंइहून व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सद्वारे बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकाऱ्यांसह विभागप्रमुख उपस्थित 
जिल्‍हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. १७) झालेल्‍या या बैठकीस जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिकेचे आयुक्‍त डॉ. सुनील लहाने, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्‍हा उपनिबंधक प्रविण फडणीस, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. चंद्रकांत मस्‍के, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निळकंठ भोसीकर व इतर विभागांचे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.

खाजगी वैद्यकीय तज्‍ज्ञांना गरजेनुरुप निमंत्रित करणे योग्य
कोरोना बाधितांवर उपचार होण्‍यासाठी खाजगी रुग्‍णालयांचा शासनाने विचार करुन काही निर्देश दिले होते. जिल्‍हा व तालुका पातळीवर असलेले हे खाजगी रुग्‍णालय आकाराने लहान असल्‍यामुळे अशा ठिकाणी कोरोना बाधित व्‍यक्‍तींना उपचारासाठी ठेवणे अधिक आव्‍हानात्‍मक होईल. लहान रुग्‍णालयांना यात समाविष्‍ठ करण्‍याऐवजी एखाद्या मोठ्या जागेवर मोठ्या स्‍वरुपाचे उपचार केंद्र निर्माण केले आणि त्‍याठिकाणी खाजगी वैद्यकीय तज्‍ज्ञांना गरजेनुरुप जर उपचार देण्‍यासाठी निमंत्रित केले तर हे सर्वार्थाने योग्‍य ठरेल, असे निर्देश त्‍यांनी देवून याबाबत जिल्‍हा पातळीवर नियोजन करण्‍याचे सांगितले.

१०० बाधितांची सोय होइल अशी अतिरिक्‍त तयारी 
जिल्‍ह्यात डॉ. शंकरराव चव्‍हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १५० रुग्‍णांच्‍या उपचाराची सुविधा तर जिल्‍हा रुग्‍णालयात ५० रुग्‍णांची सुविधा उपलब्ध आहे. यात आणखी १०० बाधितांची सोय होवू शकेल अशी अतिरिक्‍त तयारी करण्‍यात आली आहे. एनआरआय कोविड सेंटर येथे ३०० बाधितांच्‍या उपचाराची तर पंजाब भवन येथे १०० बाधितांच्‍या उपचाराची सर्व ती तयारी जिल्‍हा प्रशासनातर्फे केली असल्‍याची माहिती त्‍यांना देण्‍यात आली. जिल्‍हा रुग्‍णालयाच्‍या परिसरात एक चांगले रुग्‍णालय जिल्‍हा वासियांसाठी उपलब्‍ध व्‍हावे यासाठी आम्‍ही प्रयत्‍नशिल होतो. लॉकडाउन काळात मागील तीन महिन्‍यात हे काम युध्‍द पातळीवर केल्‍याने लवकरच या नव्‍या रुग्‍णालयाची जिल्‍ह्यात भर पडत असल्‍याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्‍यक्‍त केले.

कापूस वाहतुकीसाठी शेतकऱ्यांची ओढाताण 
जिल्‍ह्यात दाखल झालेला मान्‍सून, पेरणीच्‍या प्रक्रिया, साथीचे आजार, अतिवृष्‍टी झाली तर धोकादायक स्थितीत अडकणारी गावे, अपघात प्रवण रस्‍त्‍यावरील लहान, मोठे पूल, हमीभाव खरेदी केंद्रे, प्रा‍थमिक आरोग्‍य केंद्राची स्थिती, शालेय शिक्षण आदीबाबत विभागाच्‍या प्रमुखांकडून आढावा घेतला. कापसाच्‍या उत्‍पादनानुसार जिल्‍ह्यात पाहिजे त्‍या प्रमाणात जिनिंग प्रेसिंग मिल्‍स उपलब्‍ध नसल्‍याने शेतकऱ्यांची कापूस वाहतुकीसाठी ओढाताण होते. ही ओढाताण रोखण्‍यासाठी उद्योजकतेला चालना दिली जाईल. बाजारपेठेतील गर्दी टाळण्‍यासाठी शहराच्‍या जवळ एमआयडीसीच्‍या खुल्‍या जागा आहेत, त्‍या जागेवर नवीन बाजारपेठा आकारात याव्‍यात. 

गोदावरी प्रदुषण रोखण्‍यासाठी उपाय करण्‍याचे निर्देश
कापूस वाहतुकीच्‍या प्रश्‍नाला सोडविण्‍यासाठी जिल्‍ह्यातून जाणाऱ्या रेल्‍वे मार्गाचा उपयोग करुन घेता येइल. किनवट आणि भोकर या ठिकाणी रॅकची सुविधा निर्माण केली तर या दोन तालुक्‍यासह आजूबाजू इतर गावातीलही शेतकऱ्यांचा प्रश्‍न सुटेल. यासाठी त्‍यांनी जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांना लक्ष घालण्‍यास सांगितले. गोदावरी नदीच्या प्रदुषणाला रोखण्‍यासाठी उपाय योजना लागतील त्‍यावर तत्‍काळ काम सुरु करण्‍याचे निर्देश त्‍यांनी डॉ. सुनील लहाने यांना यावेळी दिले. शेतकऱ्यांना वेळेवर बी-बियाणांचा कमतरता पडणार नाही याची खातरजमा करावी, नअसे आदेश पालकमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले. 

चांगल्‍या अधिकाऱ्याला आपण गमावलो
जिल्‍ह्यातील विकास कामांचा आढावा सुरु असतांना पालकमंत्री अशोक चव्‍हाण यांनी एक शासकीय अधिकाऱ्यांप्रती असलेल्‍या संवेदनेचा हळवा कोपरा जागा केली. जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सेवानिवृत्त प्रकल्‍प संचालक नईम कुरेशी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या बैठकीत त्‍यांनी कुरेशी यांची आठवणींना उजाळा देत एका चांगल्‍या अधिकाऱ्याला आपण गमावलो आहोत या शब्‍दात आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. क्षणभर बैठकीस सहभागी असलेले सर्व अधिकारी ही संवेदनशिल झाले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

Latest Maharashtra News Updates : महायुतीचं निर्विवाद वर्चस्व! देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Maharashtra Assembly Election Result: पुण्यातील 'या' मतदारसंघात अनेक वर्षांची परंपरा कायम; जनतेचा कौल नव्या आमदाराकडेच

Hemant Soren : झारखंडचा गड सोरेन यांनी राखला...इंडिया आघाडीला दोन तृतीयांश बहुमत; भाजपचा रथ रोखला

SCROLL FOR NEXT