नांदेड - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी (ता. पाच) महापालिका आणि वृक्षमित्र फाउंडेशनतर्फे शुक्रवारी माता गुजरीजी विसावा उद्यानात जिल्हाधिकारी डॉ. विपीन, आयुक्त डॉ. सुनील लहाने, महापौर दीक्षा धबाले आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वनविभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी (ता. पाच) जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, वन विभागासह इतर विभागाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
हे ही वाचा - सावधान...कोरोना येऊ शकतो तुमच्या घरात!
महापालिका, वृक्षमित्रतर्फे वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिका आणि वृक्षमित्र फाउंडेशनतर्फे हरित नांदेड अभियानाचा शुभांरभ करण्यात आला. त्या अंतर्गत माता गुजरीजी विसावा उद्यान येथे ४५ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापौर दीक्षा धबाले, आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रकाशकौर, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, शुभम क्यातमवार, उद्यान अधीक्षक डॉ. फरतुल्ला मिर्झा बेग, वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोष मुगटकर, कैलास अमीलकंठवार, प्रा. परमेश्वर पौळ, गणेश साखरे, अनंत बोडके, पवन मुत्तेपवार, विजय देशमाने, संजय बोडके, पवन मुत्तेपवार, विजय देशमाने, संजय बोडके, सतीश कुलकर्णी, अनंत कुलकर्णी, बंदमवार, संभाजी सोनटक्के, नानाजी रामटेके, अतुल डोंगरगावकर, लक्ष्मीकांत कोल्हेकर, प्रल्हाद घोरबांड, प्रदीप मोरलवार, किशन देशमुख, डॉ. चिमणे, गंगाबिशन यादव आदी उपस्थित होते.
हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी आमदारांनी घेतला हा निर्णय !
पर्यावरणप्रेमी नागरिकांना आवाहन
हरित नांदेड अभियानात सहभाग घेऊन हरित नांदेडचे स्वप्न साकार करावे. पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. शहराचे वाढते तापमान ही एक मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्याचे संगोपन करुन त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. शहरात वृक्षाचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून लोकसहभागातून पुढील तीन वर्षात संगोपनाची हमी घेणाऱ्या व्यक्ती, शाळा, महाविद्यालये यांच्या मदतीने मोकळ्या जागा, कॉलनी तसेच रस्त्याच्या दुतर्फा विविध ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
हेही वाचलेच पाहिजे - Corona Breaking ः आज पुन्हा सात पॉझिटिव्ह, तीनच दिवसात ३७ रुग्णांची भर
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण
प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावावे आणि त्याचे संवर्धन करावे. प्रशासनानेदेखील अटल आनंदवन घनवन राबवून वृक्षारोपण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी शुक्रवारी (ता. पाच) केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, महापालिकेचे आयुक्त डाॅ. सुनील लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, सदाशिव पडदुणे, शरद मंडलिक, संतोषी देवकुळे यांच्याही हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तहसीलदार वैशाली पाटील, ए. बी. बिरादार, विधी अधिकारी आनंद माळाकोळीकर, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, वन अधिकारी, जिल्हा एमआयएस समन्वयक रूपेश झंवर, गणेश नरहिरे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रसाद डुबुकवाड आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.