नांदेड - आज पृथ्वीला एका कोरोना नावाच्या महामारीने ग्रासून टाकलयं. मानवजात हताश झालीयं असं वाटतयं. पण मानवावर हे पहिलंच संकट आहे का? या आधी देखील अनेक महामारी येऊन गेल्या आहेत. त्यातून देखील माणूस पृथ्वीवर टिकून राहिला एवढंच नव्हे तर राज्य करायला लागला. त्यामुळे कोरोना आणि लॉकडाउनचा हा काळही निघून जाईल आणि पुन्हा मानव नव्या जाणीवेने, नव्या समृद्धीने, तहेदील सामोरे जाईल, असा विश्वास कवी, साहित्यिक प्रा. मनोज बोरगावकर यांनी व्यक्त केला.
जगात जीव ओतून काम करणारे किंवा मनःपूर्वक, अंतकरणापासून काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या तशी दुर्मिळच. नांदेडचे प्रा. मनोज बोरगावकर हे त्यापैकी एक असलेलं दिलखुलास व्यक्तीमत्व. त्यांची ‘कोरा कागद...निळी शाई...’,‘अकथ कहाणी, सद्गुणांची’, ‘नदीष्ट’ ही कांदबरी असेल किंवा आणखी काही कविता संग्रह असतील. या माध्यमातून त्यांनी मराठीचे साहित्यविश्व समृद्ध केले आहे.
हेही वाचा - कुणी आणली आशा वर्करवर उपासमारीची वेळ ?...वाचा
त्यांच्या 'नदीष्ट' ह्या समकालीन महत्वपूर्ण कादंबरीला नुकताच मानाचा पुरस्कारही जाहीर झाला आहे. अनेक मोठमोठ्या कवीसंमेलनात सहभागी होणारे त्याचबरोबर ज्यांच्या साहित्यावर अनेक दिग्गज साहित्यिक, कवी, कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्यांच्या साहित्याला अनेक पुरस्कारांचा साज चढला आहे, अनेक अक्षरमैफली सजल्या आहेत अशा प्रा. बोरगावकर यांनी कोरोनासारख्या महामारी आणि लॉकडाउनच्या काळात निर्माण झालेल्या भावना वाचकांसमोर व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा - टपाल विभाग अंधाराची दृष्टी व अपंगांची काठी
हरवलेलं शोधू या...
कोरोना आणि लॉकडाउनमध्ये घरीच अडकून पडलेल्या आपण सर्वांनी आपल्या जगण्यातलं सत्व शोधू या. जो कंटेट हरवलायं तो शोधू या, पुन्हा त्याला मिळविण्याचा प्रयत्न करु या. सध्याचा काळ हा सोशल डिस्टन्सिंगचा असला तरी त्यातून आपण आपली तुटलेली, दूर गेलेली नाती, मैत्री पुन्हा एकदा नव्याने जोडू या. त्याची नोंद करुन पुन्हा एकदा हरवलेलं शोधू या. जगण्याचा अन्वयार्थ शोधू या. स्वतःला, इतरांना आणि सर्वांथाला समजाऊन घेऊ या आणि आपलं आयुष्य पुन्हा एकदा समृद्ध करण्याचा प्रयत्न करु या, असे आवाहन प्रा. बोरगावकर यांनी केलंय.
हेही वाचलेच पाहिजे - मुंबईवरुन आलेला बारडचा तरुण पाॅझिटिव्ह....रुग्ण संख्या ५३ वर
तहेदिल सामोरे जाऊ या...
जीवन हे नदीसारखे वाहते असले पाहिजे. सुख, दुःख ही अनुभवाने आपले आयुष्य समृद्ध करत असतात. निसर्गाचा अनुभव घरातही घेता येऊ शकतो. आपल्या घरातील कुंड्यातील झाडे, वेली, फुले हे देखील आपलं मन प्रसन्न करु शकतात. फक्त त्यासाठी आपल्याकडे ती दृष्टी असली पाहिजे. वेळ आपल्याला शिकवत असल्यामुळे अशा वेळी आलेल्या संकटांना धीराने तोंड द्या. या काळातही सकारात्मक रहा.
येथे क्लिक करा - Video-कोरोना : रोगप्रतिकारक शक्ती वाढविणेच एकमेव उपाय
मानवजात ही चिवट असल्यामुळे अशा संकटातूनही निच्शितच मार्ग काढेल, यात शंका नाही पण त्यासाठी आपण सर्वांनी सकारात्मक राहिले पाहिजे. निराश, हताश होऊन चालणार नाही. मानवाने अनेक संकटे यापूर्वी झेलली आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या जाणीवेने, नव्या समृद्धीने, तहेदिल सामोरे जाऊ या आणि आपले जीवन पुन्हा एकदा आनंदी आणि सुखमय करण्याचा प्रयत्न करु या...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.