file photo 
नांदेड

Video - स्वतःचा नाही तर किमान दुसऱ्यांचा तरी वाचवा जीव...

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोना आणि लॉकडाउनच्या गेल्या अडीच महिन्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना काय कराव्यात याचीही माहिती नागरिकांना झाली आहे. तरी देखील काहीजण अजूनही हलगर्जीपणा करताना दिसून येत असल्यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजारपेठ आणि दुकाने सुरु झाल्यामुळे आता प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. किमान स्वतःची नाही तर दुसऱ्यांची तरी काळजी करण्याची गरज आहे. 

कोरोना विषाणूचा फैलाव जगभरातील विविध देशात सुरु झाल्यानंतर भारतातही मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ता. २४ मार्चपासून भारतातही लॉकडाउन सुरु झाले. ता. ३१ मे पर्यंत पाच टप्पे लॉकडाउनचे झाले. आता गेल्या आठवडाभरापासून लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. काही नियम आणि अटी, शर्थीनुसार बाजारपेठ आणि सर्व दुकाने सुरु करण्यात आली आहेत. मात्र, अनेकजण प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करताना दिसून येत नाहीत. 

प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करा
कोरोनामुळे गेल्या अडीच महिन्यापासून सुरु असलेला लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकही आपल्या व्यवहाराशी जुळवून घेऊ पाहत आहेत. रस्त्यांवर, बाजारपेठेत काही प्रमाणात वर्दळ वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी देखील आता स्वतः तसेच इतरांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याची गरज आहे. 

नियम तोडणाऱ्यांवर कारवाई
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी कोरोना विषयक नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी, नागरिकांना दंड लावण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने सहा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सहा पथके स्थापन करण्यात आली आहेत. तोंडाला मास्क न लावणे, सॅनीटायझरचा वापर न करणे आणि फिजीकल डिस्टन्सिंगचा वापर न करणे या व इतर कारणांसाठी पथकाच्या वतीने कारवाई करुन दंड वसूल करण्यात येत आहे. 

कोरोना संपलेला नाही - आयुक्त डॉ. लहाने
लॉकडाउन शिथील करण्यात आले असले तरी अजूनही कोरोना विषाणूचा संसर्ग संपलेला नाही. अजूनही काही भागात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी दक्ष राहणे महत्वाचे असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले. अत्यावश्‍यक काम असल्याशिवाय शक्यतो घराच्या बाहेर पडू नका. घरातील एकाच व्यक्तीने बाहेर जावे आणि जाताना स्वतःची काळजी घ्यावी.

तोंडावर मास्क किंवा स्वच्छ रुमाल बांधावा. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी घराबाहेर तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. सॅनीटायझरचा आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा. व्यापाऱ्यांनी देखील कोरोनाविषयक नियमावलीचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. लहाने यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : मविआचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव का झाला? शरद पवार यांनी सांगितली 'ही' कारणं

Sharad Pawar: ''...म्हणून झारखंडची निवडणूक महाराष्ट्रासोबत घेतली'' शरद पवारांनी सांगितलं भाजपच्या विजयामागचं गुपित

Latest Maharashtra News Updates : नवीन मंत्रिमंडळात दिसणार नवीन चेहरे- सूत्र

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: व्येंकटेश अय्यरव ठरला तिसरा महागडा खेळाडू! जाणून कोणाला किती बोली लागली

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

SCROLL FOR NEXT