file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात १३ लाख मतदार निवडणार गावचे कारभारी; १०६ ग्रामपंचायती बिनविरोध तर ९०७ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान

अभय कुळकजाईकर

नांदेड - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम लागलेल्या एक हजार १३ ग्रामपंचायतींपैकी ९०७ ग्रामपंचायतीसाठी येत्या शुक्रवारी (ता. १५ जानेवारी) मतदान होत आहे. यात सहा हजार ८६२ सदस्य निवडण्यासाठी सहा लाख ३२ हजार ९० स्त्री, सहा लाख ८९ हजार ११८ पुरूष आणि बारा इतर असे एकूण १३ लाख २१ हजार २२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

नांदेड जिल्ह्यात १६ तालुक्यात एकूण एक हजार ३०९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी एक हजार १५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार होते. यापैकी जांब (ता. मुखेड) आणि आलेगाव (ता. कंधार) या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणूक रद्द झाली. यामुळे एक हजार १३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यातील ९०७ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. 

९०७ ग्रामपंचायतीसाठी निवडणुक
निवडणुक होत असलेल्या ९०७ ग्रामपंचायतीत दोन हजार ८२८ प्रभाग आहेत. या प्रभागातून सहा हजार १६२ सदस्यांना १३ लाख २१ हजार २२० मतदार निवडून देणार आहे. त्यात स्त्री मतदार सहा लाख ३२ हजार ९० तर पुरुष मतदार सहा लाख ८९ हजार ११८ आहे. तर इतर मतदार १२ असल्याची माहिती सामान्य विभागाचे उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक यांनी दिली.

मुखेड, हदगाव तालुक्यात जास्त संख्या
जिल्ह्यात मुखेड आणि हदगाव तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी १०८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. तर लोहा ८४, देगलूर ८५, नायगाव ६८, नांदेड ६५, भोकर ६३, बिलोली ६४, कंधार ९७, उमरी ५७, माहूर दहा, धर्माबाद ४०, किनवट २६, हिमायतनगर ५०, मुदखेड ४५, भोकर ६३, अर्धापूर ४३ अशा तालुका ग्रामपंचायत मतदान होत असल्याची माहिती सामान्य विभागाचे उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक यांनी दिली.

१०२ जागा राहणार रिक्त
नामनिर्देशन दाखल करण्याच्या कालावधीत १०२ ठिकाणी वैध अर्ज दाखल झाले नाहीत. यामुळे सोळा तालुक्यातील १०२ सदस्य संख्या रिक्त राहणार आहेत. यात राखीव प्रर्वगाचा उमेदवार उपलब्ध नसणे, जात प्रमाणपत्र नसणे आदी कारणे असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

तालुकानिहाय निवडणुकीची माहिती

  1. क्रमांक - तालुक्याचे नाव - निवडणुक ग्रामपंचायत संख्या - बिनविरोध ग्रामपंचायती - प्रत्यक्ष निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती - प्रत्यक्ष निवडणुक प्रभाग - मतदान केंद्र - प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या जागा - स्त्री मतदार - पुरूष मतदार - इतर - एकूण मतदार
  2. नांदेड - ६५ - सात - ५८ - २२८ - २२८ - ४५६ - ५१, ७१९ - ५७, ०७० - दोन - १, ०८, ७९१
  3. अर्धापूर - ४३ - सहा - ३७ - ११९ - १३१ - २९७ - ३१, ०३५ - ३३, ९२५ - एक - ६४, ९६१
  4. भोकर - ६३ - बारा - ५१ - १४१ - १४१ - ३३३ - २७, ५७७ - २८, ९३७ - शून्य - ५६, ५१४
  5. मुदखेड - ४५ - पाच - ४० - १३३ - १३३ - ३१० - २८, ३३० - ३०, ९८८ - एक - ५९, ३१९
  6. हदगाव - १०८ - तेरा - ९५ - २८५ - २९७ - ७१३ - ६७, ४१९ - ७४, २४९ - शून्य - १, ४१, ६६८
  7. हिमायतनगर - ५० - तीन - ४७ - १२९ - १२९ - ३१० - २६, १७३ - २८, ५३२ - एक - ५४, ७०६ 
  8. किनवट - २६ - दोन - २४ - ७० - ७० - १७७ - १३, ७९१ - १४, ५७२ - शून्य - २८, ३६३
  9. माहूर - दहा - शून्य - दहा - ३० - ३० - ७८ - ६, ०५९ - ६, ६७८ - शून्य - १२, ७३७
  10. धर्माबाद - ४० - तीन - ३७ - १०२ - १०२ - १९५ - १८, ५९५ - १९, ४३९ - शून्य - ३८, ०३४ 
  11. उमरी - ५७ - नऊ - ४८ - १३१ - १३१ - २४, ५३६ - २६, ५८२ - शून्य - ५१, ११८
  12. बिलोली - ६४ - चार - ६० - १८४ - १८४ - ४७७ - ४१, ८१४ - ४४, ७३१ - शून्य - ८६, ५४५
  13. नायगाव - ६८ - पाच - ६३ - २०१ - २०८ - ५२५ - ४७, ४३९ - ५१, ७३७ - शून्य - ९९, १७५
  14. देगलूर - ८५ - नऊ - ७६ - २४२ - २४२ - ६०९ - ५३, ७६६ - ५८, ३२८ - शून्य - १, १२, ०९४
  15. मुखेड - १०८ - सहा - १०२ - ३११ - ३१८ - ८०४ - ७३, ५२३ - ८०, ९८७ - एक - १, ५४, ५११
  16. कंधार - ९७ - पंधरा - ८२ - २८० - ३२० - ६७३ - ६५, ५६६ - ७२, ६१० - सहा - १, ३८, १८२
  17. लोहा - ८४ - सात - ७७ - २४२ - २४९ - ६०४ - ५४, ७४८ - ५९, ७५३ - शून्य - १, १४, ५०१
  18. एकूण - एक हजार १३ - १०६ - ९०७ - २, ८२८ - २,९१३ - ६, ८६२ - ६, ३२, ०९० - ६, ८९, ११८ - बारा - १३, २१, २२० 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT