warm welcome to pm narendra modi at Nanded Airport pratap chikhlikar name skip from invitation 
नांदेड

PM Modi Nanded Visit : पंतप्रधान मोदींचे नांदेड विमानतळावर स्वागत; चिखलीकरांचे नाव वगळल्याने चर्चा

पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण व जाहीर सभेसाठी शनिवारी (ता. ५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नांदेड येथील गुरुगोविंदसिंगजी विमानतळावर सकाळी साडेदहा वाजता आगमन झाले.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण व जाहीर सभेसाठी शनिवारी (ता. ५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नांदेड येथील गुरुगोविंदसिंगजी विमानतळावर सकाळी साडेदहा वाजता आगमन झाले. यावेळी प्रवेशपत्रिकाधारकांच्या यादीतून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव वगळण्यात आल्याने चर्चेला उधाण आले होते.

खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, पोलिस महासंचालक बिपीन कुमार सिंग, जिल्हाधिकारी अभिजित राऊत,

जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह मान्यवरांनी मोदींचे स्वागत केले. याशिवाय पक्षाचे काही पदाधिकारीही हजर होते. परंतु, माजी खासदार चिखलीकरांची गैरहजेरी दिसून आली. त्यामुळे भाजपमधील गटबाजीची चर्चा चांगली रंगली होती.

दरम्यान, स्वागतासाठी उपस्थित राहणाऱ्या नेते, कार्यकर्त्यांची यादी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडून अंतिम करण्यात आली होती. ही यादी जिल्हा प्रशासनाने पक्षाकडे मागविली होती. त्यानुसार नांदेड महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्यासह नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी स्वागतासाठी उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची यादी प्रशासनाकडे सोपवली होती. मात्र, ही यादी अंतिम झालीच नाही.

या यादीला वगळून दुसरीच यादी पुढे आली आहे. सदर यादी प्रदेश कार्यालयातून देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. किशोर देशमुख, दिलीप कंदकुर्ते यांनीही आपण प्रशासनाला दिलेली यादी अंतिम झाली नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, यासंबंधी प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची झाली ऑनलाइन बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT