नांदेड : राज्यात व संबंध देशभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना हा आजार ग्रामिण पातळीपर्यंत जाऊन पोहचला आहे. तळागाळातील नागरिकांना मदत व्हावी व त्यांची या लॉकडाउनमध्ये अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. तसेच प्रशासनाच्या काही उणिवा असतील तर त्यांना सांगुन त्यांच्या कामावर लक्ष ठेवा अशा सुचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी झूम ॲपद्वारे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना सोमवारी (ता. २५) दिल्या. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे आणि उमेश मुंडे यांची उपस्थिती होती.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात चौथा लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. त्यासोबतच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना उघडण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी उद्योगांनाही अटी व शर्थीच्या अधिन राहून सुरू करण्याची परवानगी दिली आहे. लॉकडाउनमध्ये हातावर पोट असणाऱ्यांच्या हाताला काम मिळावे व त्याच्या घरची चुल पेटावी यासाठी शिवसैनिकांनी गोर-गरीबापर्यंत पोहचुन शासनाच्या योजनांची त्यांना माहिती देऊन लाभ मिळवून द्यावा.
हेही वाचा - Video - पालकमंत्री अशोक चव्हाण उपचारासाठी मुंबईला रवाना...
प्रशासनाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून रहा
नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची वाढती व्याप्ती ही चिंताजनक असल्याचे दत्ता पाटील कोकाटे यांनी सांगितले आहे. तसेच आज घडीला कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना लॉकडाउनमदध्ये शिथिलता करण्यात आल्याने नांदेडकरांमध्ये भितीचे वातावरण पसरल्याचे श्री. कोकाटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले. यावेळी श्री. ठाकरे यांनी सांगितले की प्रशासनाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून त्यांच्यातसोबत राहून हे कोरोना संकट घालवायचे आहे. त्यासाठी सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधीनी प्रशासनाला सहकार्य करून नागरिकांना दिलासा द्यावा.
कठीण काळात शिवसेनेची साथ महत्वाची
कोरोनामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यांना धीर देण्यासाठी आपल्या पदाधिकऱ्यांनी पुढे यावे. गोरगरीब व गरजू व्यक्तीना आपल्यापरीने जेवढी मदत करता येईल तेवढी करा. बाकी आपल्या सर्वासोबत सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील एकूणच कोरोनाची परिस्थीती व हाताळतांना प्रशासनाला येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करा असे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले आहे. तसेच राज्यातील जनतेनी कोरोनाला न घाबरता त्याच्याशी दोन हात करण्याची तयारी ठेवा. मात्र घरी राहून सुरक्षीत राहाच परंतु बाहेर पडलेत खबरदारी घ्या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.