दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव  
नांदेड

नांदेडची कन्या ‘भाग्यश्री’ ची पॅरा ऑलिंपिकसाठी भरारी

शिवचरण वावळे

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्री माधव जाधव हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन जिल्हा, राज्य, राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, कांस्य जिल्हा, राज्य, राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, कांस्य पदकांची कमाई केली होती.

नांदेड : टोकिओ Tokyo येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅराऑलिंपिक स्पर्धेचा भारतीय संघ जाहीर झाला आहे. या संघात नांदेडची Nandedभूमीकन्या, अष्टपैलु आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव Woman Player Bhagyashree Jadhav हिचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रातून निवड होणारी ती एकमेव महिला खेळाडू आहे. नांदेडच्या भूमिकन्येनी ‘पॅरा ऑलिंपिक’ स्पर्धेसाठी आंतराष्ट्रीय भरारी घेतल्याने तिच्याकडुन नांदेडकरांच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या Maharashtra अपेक्षा वाढल्या आहेत. नवी दिल्ली येथे ता. २९ व ३० जून रोजी पॅराऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीनंतर २४ जणांची भारतीय संघात निवड करण्यात आली. त्यातील चार महिला खेळाडूंमध्ये नांदेडची भूमी कन्या भाग्यश्री जाधवचा समावेश आहे. भारतीय संघात निवड होणारी महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू आहे. woman player bhagyashree jadhav qualify for paralympic games in tokyo

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्री माधव जाधव हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन जिल्हा, राज्य, राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, कांस्य जिल्हा, राज्य, राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, कांस्य पदकांची कमाई केली होती.त्यानंतर वर्ष २०१९ मध्ये झालेल्या चीन येथील जागतिक पॅरा अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत तिने दोन कांस्य पदके मिळवून त्यावर भारताचे नाव कोरले होते. या स्पर्धेत सहभागी झालेली ती महाराष्ट्रातील एकमेव दिव्यांग खेळाडू होती. २०२१ मध्ये दुबई येथे झालेल्या फाजा पॅरा अॅथॅलेटिक्स ग्रँड प्रिक्स या जागतिक स्पर्धेत देखील तिने गोळाफेकमध्ये रौप्यपदक, तर भालाफेक या क्रीडा प्रकारात तिने कांस्यपदक मिळवून भारताची शान राखली होती. ऑलिंपिक व आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचे तिचे स्वप्न होते. खांद्याला जबर दुखापत झालेली असताना देखील तिचा स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा संघर्ष सुरुच आहे.

आर्थिक परिस्थितीवर मात करित यशोशिखर गाठण्यासाठी तिचे जीवापाड प्रयत्न सुरु आहेत. गोळाफेक या क्रीडा स्पर्धेत एफ ३४ या वर्गवारीत ती पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. येत्या ऑगस्टमध्ये टोकिओमध्ये ऑलिंपिकनंतर पॅरा ऑलिंपिक स्पर्धा होणार आहेत. या जागतिक क्रीडा स्पर्धेत आपण भारताच्या तिरंगा ध्वज अभिमानाने फडकवित पदकाची कमाई करु, असा आत्मविश्वास तिने बोलून दाखविला आहे. आपल्या क्रीडा जीवनातील अंतिम ध्येय गाठण्यासाठी माझे मुख्य प्रशिक्षक सत्यनारायण, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव प्रकाश कांबळे, माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर, हिंगोलीचे जिल्हा नियोजन अधिकारी रामदास पाटील, विवांश जीमचे अनिल पाटील भालेराव, मातोश्री गर्ल्स हॉस्टेलचे सुधीर पाटील, प्रलोभ कुलकर्णी यांचे नेहमीच सहकार्य लाभले, अशी कृतज्ञता तिने व्यक्त केली. मराठी बाणा देशपातळीवर गाजवणाऱ्या या महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवणाऱ्या या नांदेडच्या भूमीकन्येचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

२८ पदके जिंकली

भारताने वर्ष १९५२ ते २०१६ या दरम्यान हॉकी, नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग, वेटलिफ्टींग, टेनिस, बॅटमिंटन व अॅथलेटिक्स अशा विविध स्पर्धेत नऊ सुवर्ण, सात रजत आणि १२ कांस्य असे मिळुन २८ पदके जिंकली आहेत. उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भारतास आतापर्यंत सर्वाधिक यश मिळालेले आहे. वर्ष २०१२ मध्ये उन्हाळी ऑलिंपिकसाठी ८३ खेळाडु पात्र ठरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

कधी स्पॉटबॉयचं काम तर कधी अभिनेत्रींचे कपडे इस्त्री केले ; बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा डोळ्यात पाणी आणणारा स्ट्रगल

SCROLL FOR NEXT