मराठा आरक्षणाच्या मुद्दा राज्यात पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाज एकत्रित आला आहे. मराठा आंदोलकांकडून मराठा आरक्षणाची मागणी आणखी तीव्र होत आहे. तर मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यावर विचार करण्यासाठी सरकारला दिलेला वेळ संपत आला आहे. मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेणार आहेत, ते आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. अशातच मराठा आरक्षणासाठी नांदेडमधील एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. नांदेडमधील एका तरुणाने विष प्राशन करुन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.
दरम्यान या तरुणाच्या मृतदेहाच्या जवळ सुसाईड नोट देखील सापडली आहे. नांदेडमधील हदगांव तालुक्यातील वडगाव येथील शुभम सदाशिव पवार या तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे. या तरूणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची आत्महत्या
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सुनील कावळे 45 वर्ष अस आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली.
मनोज जरांगे आज स्पष्ट करणार भूमिका
मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र द्यावे आदी मागण्यासाठी मनोज जरांगे यांनी शासनाला दिलेली मुदत मंगळवारी (ता. २४) संपत आहे. मुदत संपत आली तरी शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, रविवारी (ता.२२) अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे जरांगे पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यात ते काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिष्टमंडळाने भेट देऊन आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मुदत मागितली होती. ती मंगळवारी संपत असून, अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, जरांगे आपली भूमिका मांडणार आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.