lightning  Sakal
नांदेड

Nanded News : स्प्रिंकलरचे पाइप जमा करताना काळाचा घाला; वझरा येथे वीज पडून युवकाचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

माहूर : शेतात स्प्रिंकलरचे पाइप जमा करताना अचानक वीज कोसळल्याने तालुक्यातील वझरा येथील एका १८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. सदरील घटना सोमवारी (ता. १७) सायंकाळी पाच वाजता घडली.

माहूर येथून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेख फरीद वझरा येथे शेतात स्प्रिंकलरचे पाइप जमा करीत असताना आनंद तुकाराम मुंडे (१८) याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सरपंच दीपक केंद्रे, दत्त मांजरी येथील पोलिस पाटील रितेश केंद्रे, हरीश मुंडे, हनुमंत मुंडे, माजी सरपंच सुनील फड, प्रभू चोले, बालाजी केंद्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तसेच, माहूर पोलिस स्टेशनचे जमादार बाबू जाधव, तलाठी ए.व्ही. कुडमते यांनी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. सायंकाळी आठ वाजता माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात मृत आनंद मुंडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. शहर व तालुक्यात सायंकाळी वातावरणात बदल झाला. जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरवात झाली असता ही घटना घडली. यामुळे वझरा गावावर शोककळा पसरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT