Angela Merkel sakal
नवरात्र

Angela Merkel: जगातल्या सर्वात पाॅवरफुल महिलेने स्वेच्छेने घेतला होता राजकारणातून संन्यास

मर्केल यांच्या कार्यकाळात जर्मनी युरोपात सर्वाधिक वेगाने आर्थिक प्रगती करणारा देश बनला आहे

सकाळ डिजिटल टीम

नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण जगावर आपली छाप सोडणाऱ्या कतृत्वान महिलांबद्दल जाणून घेणार आहोत. आज आपण अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेऊया ज्या प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी ठरणार आहे

जगातली सर्वात शक्तीवान महिला म्हणून अनेकदा नामंकीत होणाऱ्या आणि ख्याती मिळवणाऱ्या जर्मनीच्या माजी पंतप्रधान अँजेला मर्केल यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

१६ वर्षे सत्तेत असणाऱ्या मर्केल यांनी सलग चार वेळा विजय मिळवला आणि त्यांनी त्यांचे पंतप्रधानांचे चार कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केले. यासह त्यांनी जगभरात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाचा कारभार त्यांनी समर्थपणे सांभाळला. तसंच या काळात त्यांनी घराणेशाहीला पूर्णपणे दूर ठेवलं.

अँजेला मर्केल या उच्चशिक्षित आहेत. फिजिसिस्ट आणि क्वांटम केमिस्ट असलेल्या मर्केल या नेहमीच प्रसिद्धीपासून खूप दूर होत्या. इतर नेत्यांप्रमाणे त्यांच्याकडे आलिशान गाडी, खासगी जेट किंवा बंगला नव्हता. साधी राहणी असलेल्या अँजेला मर्केल यांनी चार वेळा पंतप्रधान राहताना त्यांची साधी वेशभूषा किंवा हेअर स्टाइलसुद्धा बदलेली नाही.

एकदा त्यांना पत्रकाराने तुमच्याकडे इतर ड्रेस नाहीत का असा प्रश्न केला होता. त्यावर मर्केल यांनी मी एक लोकांची सेवक आहे. मॉडेल नाही, असं धडाकेबाज उत्तर दिलं होतं. मर्केल यांच्या कार्यकाळात जर्मनी युरोपात सर्वाधिक वेगाने आर्थिक प्रगती करणारा देश बनला आहे. जर्मनीला यामुळेच युरोपचं ग्रोथ इंजिन असंही म्हटलं जातं.

जर्मनीसह संपूर्ण जगाला सर्वात मोठा धक्का हा तेव्हा बसला जेव्हा त्यांनी राजकारणातून अचानक संन्यास घेतला. २०२१ ची निवडणूक आपण लढवणार नसल्याचे सांगिलले. आपल्या मर्जीने सत्ता सुद्धा सोडणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या. भारत असो किंवा अमेरिकासोबत मर्केल यांचे नाते नेहमी घनिष्ठ राहले. त्यामुळे त्यांचा प्रभाव आजही प्रत्येकाच्या मनावर आहे.

जगात जर्मनी हा अडोल्फ हिटलरच्या नावाने कुप्रसिद्ध होता. पण एंजेला मर्केल यांनी धैर्य दाखवत जर्मनीचा इतिहासातील वाईट काळ पुसून काढला ज्यामुळे जर्मनीला जग सकारात्मक नजरेने बघायला लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT