कोल्हापूरातील शिवाजी पेठेतील बलभीम बँकेसमोर कमलजा मंदीर आहे. हे मंदीर नृसिंहमंदीर म्हणून ओळखले जाते. वरूणतीर्थ व कपीलतीर्थाला प्राचीन महत्व आहे. कमला मंदीरातील ही नवदुर्गा कमलांबा नावाने परिचीत आहे.
कमलासनावर आरूढ झालेली प्रासादीक चतुर्भूज मूर्ती आहे. साधारणपणे दोन हात उंचीची काळ्या पाषाणाची देवीची मूर्ती आहे. प्राचीनकाळी भीमाशंकर क्षेत्रावर महादेवानी दुर्गासुराशी युद्ध आरंभले. त्यावेळी आपल्या सर्व योगिनी गणासह चामुंडा समुह घेवून ही देवता, सिंहावर आरूढ होवून युद्धास आली व तिने दुर्गासुराचा नाश केला. म्हणून ब्रह्मदेवांनी या देवतेची कमलपुष्पांनी महापूजा केली. तेंव्हापासून ही देवता "गौरी कमलजा” नावाने प्रसिद्ध झाली.
या मंदिरात श्रीनृसिंह, विट्ठलरूक्मीणी, महादेव इ. देवता आहेत. पितरांच्या मुक्तीसाठी देवीची प्रार्थना करतात. पूर्वी येथे असलेल्या तळ्याला विरजतीर्थ (लोणारतळे) म्हणत असत. हे स्थान लवणालय त्याचप्रमाणे पवित्र विष्णूगया म्हणून प्रसिद्ध आहे. येथे होणारी देवकर्मे व पितरांची कर्मे विशेष फलदायी आहेत. अशी माहिती इतिहास अभ्यासक शरद तांबट यांच्या करवीक नवदुर्गा या पुस्तकात आहे.
या आहेत नवदुर्गा
कोल्हापुरात अंबाबाई मातेच्या दर्शनासोबतच नवरात्रीच्या काळात या नवदुर्गांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. यामध्ये एकांबिका (एकविरा देवी), मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) पद्मांबिका (पद्मावती देवी), प्रियांगी देवी (फिरंगाई) , कमलजा (कमलांबिका देवी), महाकाली (कलांबिका देवी) , अनुगामिनी (अनुगाई देवी), गजलक्ष्मी (गजांबिका देवी), श्रीलक्ष्मी यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.