Navratri 2022 Esakal
नवरात्र

Navratri 2022: देवी आणि देवी तत्त्व या संकल्पनेचा काय आहे इतिहास?

दिव्यत्व सर्वसमावेशक आहे परंतु ते सुप्त असते.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगानुसार, शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साजरी केली जाणार आहे.

देवी म्हणजे काय?

ज्या ऊर्जेतून दूरवरच्या अवाढव्य आणि तेजस्वी अश्या ताऱ्यांचा तसेच सूक्ष्म अश्या मानवी मनाचा आणि त्यात निर्माण होणाऱ्या भावनांचा जन्म झाला ती ऊर्जा म्हणजे ‘देवी’ होय, जिला शक्ती म्हणजेच ऊर्जा या नांवाने ओळखतात. तीच शक्ती या समस्त ब्रम्हांडाला सतत कार्यरत ठेवण्यासाठी कारणीभूत आहे. नवरात्रीमध्ये या ऊर्जेची विविध नांवानी आणि रूपांमध्ये आराधना केली जाते आणि तिला जाणले जाते. दिव्यत्व सर्वसमावेशक आहे परंतु ते सुप्त असते. पूजा आणि आराधनेच्या प्रक्रियेमुळे ते जागृत केले जाते

देवी मातेची किंवा शक्तीची तीन प्रमुख रूपे आहेत :

दुर्गा देवी : संरक्षणाची देवता

लक्ष्मी देवी: ऐश्वर्याची देवता

सरस्वती देवी: ज्ञान देवता

1) दुर्गा देवी (Durga Devi)

नवरात्रीतील पहिले तीन दिवस (1,2,3) देवीच्या ‘दुर्गा’ रुपात आराधना करतात. दुर्गा देवीच्या सहवासात नकारात्मक शक्ती नाहीश्या होतात. दुर्गा देवी नकारात्मकता सकारात्मकतेत परावर्तीत करते. दुर्गा देवी ‘जय दुर्गा’ नांवने ओळखली जाते कारण ती विजय प्राप्त करून देते.

दुर्गा देवीची काही वैशिष्ट्ये

● लाल रंग : दुर्गा देवी लाल रंगाशी संबंधित दाखवतात. लाल साडी. लाल रंग चैतन्याचे प्रतिक आहे.

● नवदुर्गा : या दुर्गा शक्तीची नऊ विविध रूपे आहेत जी सर्व नकारात्मकतेपासून बचाव होण्यासाठी एका कवचाचे कार्य करतात. ● देवीच्या या गुणांच्या स्मरणमात्रे मनातील अडथळे नष्ट होऊ लागतात.

● देवीच्या या नावांच्या उच्चाराने आपल्या चेतनेचा स्तर उंचावतो आणि आपण स्व-केंद्रित, निर्भय आणि शांत बनतो. ज्यांना चिंता, भीती आणि आत्मविश्वासाची कमतरता जाणवते त्यांना तर हे नामोच्चार खूप लाभदायक आहे.

● महिषासुर मर्दिनी : दुर्गा देवीचे एक रूप, महिषासुर मर्दिनीच्या या रुपामध्ये देवी दुर्गा महिषाची विध्वंसक आहे.

महिष म्हणजे म्हैस जे द्योतक आहे आळस, मरगळ आणि जडत्वाचे. या गुणांमुळे आपल्या भौतिक आणि अध्यात्मिक जीवनामध्ये अडसर निर्माण होतो. देवी सकारात्मक उर्जेने ओतप्रोत भरलेली असते जिच्या स्मरणाने हा आळस, मरगळ आणि जडत्व नाहीसे होतात.

2) लक्ष्मी देवी ( Lakshmi Devi)

नवरात्रीच्या पुढील तीन दिवसांमध्ये (4,5,6) देवीची लक्ष्मी रुपामध्ये आराधना केली जाते. लक्ष्मी हि संपत्ती आणि समृद्धीची देवता आहे. आपल्या जीवनाचे पालन पोषण आणि प्रगतीसाठी संपत्ती असणे गरजेचे आहे. संपत्ती म्हणजे निव्वळ धन नव्हे तर ज्ञान उपजत कला आणि कौशल्य यांची प्राप्ती होय. लक्ष्मी म्हणजे मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गरजेची भौतिक आणि अध्यात्मिक पुर्तीचे प्रकटीकरण होय.

या देवी शक्तीच्या आठ रूपांचा आपल्यावर वर्षाव होवो

आदि लक्ष्मी - हे रूप म्हणजे आपल्या मूळ स्त्रोताचे स्मरण होय. जेंव्हा आपण हे विसरतो कि आपण या समस्त ब्रम्हांडाचे अंश आहोत तेंव्हा आपण स्वतःला लहान आणि असुरक्षित समजतो. आदि लक्ष्मी हे रूप आपणास आपल्या मूळ स्त्रोताशी संलग्न करते ज्यामुळे आपल्या मनात सामर्थ्य आणि शांती निर्माण होते.

लक्ष्मी देवीची वैशिष्ट्ये

● धन लक्ष्मी - हे भौतिक समृद्धीचे रूप आहे

● विद्या लक्ष्मी - हे ज्ञान, उपजत कला आणि कौशल्य यांचे रूप आहे.

● धान्य लक्ष्मी - हे रूप अन्न धान्याच्या रुपामध्ये प्रकट होते.

● संतान लक्ष्मी - हे रूप प्रजनन क्षमता, सर्जनशीलता आणि निर्मिती क्षमतेमध्ये प्रकट होत असते. ज्या व्यक्ती सर्जनशील आणि कला कौशल्य यांनी परिपूर्ण असतात त्यांच्यावर लक्ष्मीच्या या रुपाची कृपा असते.

● धैर्य लक्ष्मी - शौर्य आणि निर्भयता या रुपामध्ये प्रकट होते.

● विजय लक्ष्मी - जय, विजय या रुपामध्ये प्रकट होते.

● भाग्य लक्ष्मी - सौभाग्य आणि समृद्धीच्या रुपामध्ये प्रकट होते.

देवी लक्ष्मी आपणा सर्वांच्या जीवनात या विविध रूपांनी प्रसन्न होऊन आपणावर कृपा करुदे. हे तीन दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असतात, देवी मां आपणावर संपत्ती आहे.

3) सरस्वती देवी (Saraswati Devi)

नवरात्रीचे अंतिम तीन दिवस (7,8,9) देवी सरस्वतीला समर्पित आहेत. सरस्वती हि ज्ञान देवता आहे जी आपणास ‘स्व’ चे ज्ञान, सार देते.

देवी सरस्वतीची महती सांगणारे अनेक पैलू पहावयास मिळतात.

● पाषाण - ती पाषाणावर बसलेली दिसते. ज्ञान जे पाषाणासारखे अचल आणि निश्चल असते जे सदोदित आपली साथ देते.

● वीणा - देवी सरस्वती वीणा वाजवताना दिसते. प्राचीन हिंदुस्तानी तंतू वाद्य वीणा, जिचे स्वर मनःशांती देतात. तद्वत अध्यात्मिक ज्ञान जीवनात विश्राम देते आणि जीवन एक उत्सव बनवते.

● हंस - तिचे वाहन हंस दाखवले जाते. दुध आणि पाण्याचे मिश्रण जर हंसाला दिले तर तो त्यातील दूधच पितो. हे विवेकाचे महत्व आणि शक्ती दर्शवते कि आपण जीवनात सकारात्मक स्वीकारले पाहिजे आणि नकारात्मक त्यागत राहिले पाहिजे.

● मोर - मोर देवीसोबत असतो. मोर नृत्य करतो आणि आपल्या रंगीबेरंगी पिसाऱ्याचे दर्शन घडवतो. परंतु हे सतत होत नाही. देवीच्या प्रतीकामुळे योग्य ज्ञान योग्य प्रसंगी, योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी प्रकट करावे हे समजते.

● देवी सरस्वती आपल्याच चेतनेचे स्वरूप आहे जी विविध गोष्टी शिकण्यासाठी उद्युक्त करत असते. तीच अज्ञान दूर करणारी आणि ज्ञानाची आणि अध्यात्मिक प्रकाशाची स्त्रोत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT