Navratri 2022 Esakal
नवरात्र

Navratri 2022 : ‘कोल्हापूर टू नागालँड’ पर्यावरण आणि आदिवासींच्या विकासासाठी झटणारी दुर्गा डॉ.श्रुती कुलकर्णी

मला आजही तो दिवस आठवतो. जेव्हा या फेलोशिपसाठी सिलेक्शन झालं तेव्हा ते काम आपल्याला जमेल का?,

Pooja Karande-Kadam

तुम्ही स्वतःसाठी लढा देणाऱ्या अनेक दुर्गा पहिल्या असतील पण आज जिला आपण भेटणार आहोत ती जरा वेगळी आहे. ती पर्यावरण संवर्धनसाठी काम करतेय. जिने आजवर अनेक ठिकाणी आदिवासी भागासाठी काम केले आहे. तीच नाव श्रुती कुलकर्णी असून ती सध्या नागालँडची राजधानी असलेल्या कोहिमामध्ये एज्युकेशन प्रकल्प पर्यावरण सल्लागार म्हणून काम करतेय. 

मला लहानपणापासूनच पर्यावरणाविषयी आवड आणि कुतूहल होतं. एका चिंचोक्यापासून झाड कसं तयार होतं आणि त्या झाडाला इतक्या चिंचा कशा लागतात, असे प्रश्न मला नेहमीच पाडायचे. मोठे झाल्यावर त्याच क्षेत्रात काहीतरी करायचं असं मी लहानपणीच ठरवलं होतं. बीएससीला असताना मी नेचर क्लबमध्ये सहभागी झाले याचवेळी मी सुहास वायंगणकरांचा पश्चिम घाटातील जैव जैवविविधतेवरील स्लाईड शो पहिला. यामुळे पर्यावरण क्षेत्रात मला अधिकृत निर्माण झाली. 

शिवाजी विद्यापीठातून पर्यावरण शास्त्रात एम.एस.सी पूर्ण केल्यानंतर 'एनव्ही क्लीन' या कंपनीत आठ महिने प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून काम केले. यानंतर दोन वर्षे राजाराम महाविद्यालयात पर्यावरण विषय शिकवत होते. 

2011 मध्ये एका फेलोशिपसाठी देशभरातून 12 लोकांमध्ये माझी माझी निवड झाली. ठाणे जिल्ह्यतील जव्हार तालुक्यातील पर्यावरण संवर्धनासाठी काम करता आले./नोव्हेंबर 2012 ते ऑगस्ट 2014 ठाणे व रायगड जिल्ह्यात सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अंतर्गत 36 शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांना पर्यावरण विषयी मार्गदर्शन केले.  2015 मध्ये एका परिषदेत भाग घेण्यासाठी मी थायलंडलाही जाऊन आले. सध्या मी नागालँडमध्ये आहे. इथले जंगल, लोक, त्यांची संस्कृती आपुलकी यासर्वांच्या मी प्रेमात आहे. 

मला आजही तो दिवस आठवतो. जेव्हा या फेलोशिपसाठी सिलेक्शन झालं तेव्हा ते काम आपल्याला जमेल का?, असा प्रश्न माझ्या मनात होता. पण, बाबांनी खूप सपोर्ट केला. आणि ४ एप्रिल २०२१ मी कोल्हापूर सोडलं. 

कोल्हापूरहून आधी पुणे एअरपोर्ट आणि मग पुढंचा प्रवास. खरंतर मिळालेली संधी माझी स्वप्नपूर्ती होती, तरी एका वेगळ्या कधी न पाहिलेल्या प्रदेशात जाऊन राहायचं. आणि काम करायचं त्यामुळं मनात धाकधूक होती. पण एक दिलासा होता की, कोलकाता आणि ईशान्येकडील भाग अगदीच परका नव्हता. ह्या आधी आसाम आणि सिक्कीमला भेट दिली होती.

नागालँड एक अशी भूमी जिथल्या लोकांशी, तिथल्या राहणीमानाशी आपला फार कमी वेळा संबंध आला असेल. काही लोकांना तर नागालँड हा भारताचा भाग आहे की, वेगळा देश वातला फरक पटकन कळत नाही. पण हा खूप विलक्षण प्रदेश आहे. ‘अहोम नागा’ या सगळ्या जुन्या प्राचीन राजवटी आहेत. ज्याच्या आपल्या देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घडणीमध्ये खूप मोठी भूमिका आहे.आदिवासी लोकांचा तिथल्या भागाचा विकास करण्यासाठी जागतिक बँकेने काही प्रोजेक्ट राबवत आहे. सध्या नागालँडमध्ये जागतिक बँक १२ शाळा उभ्या करत आहे. ज्यात सगळ्या सुविधा असतील. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ती काम करत आहे. याआधी तिने वेगवेगळ्या आदिवासी  पाड्यात जाऊन तिथल्या लोकांसाठी काम केले आहे. 

नागा लोकांकडून खुप गोष्टी शिकले. त्यात संस्कृतीचा अभिमान कसा बाळगावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. ते त्यांची वेशभूषा, दागिने, खानपान आणि वेगवेगळ्या कला ह्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतात. अर्थात हे सगळं लिहण्याचे कारण म्हणजे काही दिवस अधिक घडलेला एक किस्सा , एका किंग चिली (दिमापूर), ह्या नागा रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा योग आला. जिकडे तिकडे अस्सल नागा संस्कृती च्या गोष्टी ठेवलेल्या होत्या, त्याच बरोबर एका कोपऱ्यात काही वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. स्वतःच हॉटेल असूनही त्याने इतर लोकांच्या गोष्टी विक्रीसाठी ठेवलेल्या पाहून छान वाटलं.

नागालँडमध्ये आदिवासी आहेत असं म्हणल तर एक चित्र तुमच्या समोर उभ राहील. गळ्यात हाडे आणि अंगाला पाने गुंडाळलेले आदिवासी. अर्थात यात तुमची काही चूक नाही. आदिवासी संस्कृती असली तरी आता पूर्ण पुढारलेले तुमच्या आमच्यासारखे ऑफिसला जाणारे कार चालवणारे लोक आहेत. त्यांनी आपली संस्कृती जपली आहे. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की, ते जुन्या काळातील पारंपरिक पोषाखात वावरतात. ते आपल्या सारखेच आधुनिक कपडे घालतात. वेगवेगळ्या संस्कृतीनुसार त्यांचे पोषाख आणि दागिने असतात. कधी काही कार्यक्रम असेल तरच ते पारंपरिक वेषभुषेत दिसतात. 

मी इथे नवीन असताना. रात्रीच्या वेळी मला थंडी वाजत होती. मला चहाची गरज होती. मी हे जेव्हा माझ्या कलीगला सांगितले तर त्याने आता तशी इथं सोय नसल्याचे सांगितले. हे जेव्हा आमच्या केअरटेकरला समजले तेव्हा त्याने माझ्या कलीगसोबत त्यांच्या भाषेत काहीतरी बोलून मला त्याच्या घरी नेले. तिथे त्याच्या बायकोने मला चहा व बिस्कीट दिले. हे पाहून खरच खूप छान वाटलं..

एकीकडे सगळे कौतुक करतात तर आपलेच ओळखीचे माघारी बोलतात. हीच वय किती झालेय, लग्न केलं नाही अजून, एवढ्या लांब एकटीच राहते वैगरे असे बोलले जाते पण मला नाही फरक पडत. मी त्या गोष्टी पॉझिटीव्हली घेते. प्रत्येक महिला स्वतःच्या कर्तृत्वाने काहीतरी बनू  शकते. त्यामुळे इतरांवर अवलंबून न राहता महिलांनी वेगवेगळी क्षेत्रे निवडावीत असे मला वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT