Navratri 2023 esakal
नवरात्र

Navratri 2023 : कुठे रामलीला तर कुठे मिरवणूक; देशभरात असा साजरा होतो दसरा!

म्हैसूरमध्ये तुम्हाला शाही दसऱ्याची झलक पहायला मिळेल

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : भारतात सण-समारंभ उत्साहात साजरे केले जातात. त्यापैकीच एक सण म्हणजे नवरात्रोत्सव. नवरात्रीच्या नऊ दिवसात एकीकडे घटस्थापना, उपवास,व्रत वैकल्य मोठ्या प्रमाणावर केले जातात. आणि तरूणांपासून वयोवृद्ध व्यक्तीही गरब्यात ठेका ठरतात.

मराठी सणांबद्दल बोलायचं झालं तर श्रावण महिन्यानंतर सणांना सुरूवात होते. श्रावणातील सण, त्यानंतर येणारा गणेशोत्सव आणि मग येणारी नवरात्रीचा जल्लोषही १० दिवस चालतो. या नऊ दिवसात आपण गरबा, रास दांडिया यांची मजा घेतो. अन् दहाव्या दिवशी रावण दहन करून दसरा साजरा केला जातो.

काही संस्थान ठिकाणी तर शाही दसरा पार पडतो. दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्याचीही प्रथा आहे. दसरा साजरा करण्याच्या प्रथा, परंपराही वेगवेगळ्या आहेत. संपूर्ण देशात नवरात्रोत्सव जितक्या जल्लोषात साजरा होतो. तितक्यात उत्साहात दसराही पार पडतो.

आज आपण देशात कुठे कशापद्धतीने दसरा साजरा केला जातो. याची माहिती घेऊयात.

म्हैसूरचा शाही दसरा

म्हैसूरमध्ये दसरा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महिषासुरावर देवी चामुंडेश्वरीच्या विजयाचा गौरव करण्यासाठी म्हैसूरचे राजघराणे या 10 दिवसांच्या उत्सवाचे आयोजन करते. म्हैसूर पॅलेस लाईटिंगमुळे झगमगत असतो. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी चामुंडेश्वरीच्या मूर्तीची मिरवणूक असते. म्हैसुरच्या राजवाड्यापासून सुरू होते अन् बनिमंतप मैदानावर संपते. 

या प्रसंगी ऍथलेटिक स्पर्धा, लष्करी परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम येथे होतात. याव्यतिरिक्त, दरवर्षी दसरा प्रदर्शन आयोजित केले जाते, जिथे तुम्ही स्थानिक स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि राइड्सचा आनंद घेऊ शकता.

उत्सवाच्या शेवटच्या दिवशी चामुंडेश्वरीच्या मूर्तीची मिरवणूक असते

कोलकता

कोलकातामध्ये दसऱ्याच्या वेळी दुर्गापूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हा सण नवा उत्साह देतो. नवरात्रीत संपूर्ण शहरात तुम्हाला अनेक मंडळांमध्ये देवीची मूर्ती अन् देखावे पहायला मिळतील. इथे देवी दुर्गेची भक्ती भावाने पूजा केली जाते. याशिवाय या मंडळांमध्ये भाविकांसाठी अनेक प्रकारचे प्रसाद आणि मिठाई देखील ठेवण्यात येते. 

विजया दशमी हा कोलकात्यातील सर्वात मोठा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव दुर्गापूजेचा शेवटचा दिवस आहे. लोक मिरवणुकांचा भाग होण्यासाठी रस्त्यावर उतरतात आणि दुर्गादेवीच्या मूर्तीला निरोप दिला जातो. संगीताच्या तालावर ठेका धरत लोक यात सहभागी होतात.

तर स्त्रिया यावेळी पांढऱ्या साड्या नेसून प्रत्येक महिलेला कुंकू लावतात. ही त्यांची परंपरा आहे. देवीच्या आशिर्वादाने प्रत्येकीचे सौभाग्य टिकून राहो, अशीच त्यामागची भावना असते.

स्त्रिया यावेळी पांढऱ्या साड्या नेसून प्रत्येक महिलेला कुंकू लावतात

वाराणसी

वाराणसीपासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या रामनगरमध्ये दसरा उत्सवादरम्यान सर्वोत्कृष्ट रामलीला नाटक सादर केले जाते. काशी नगरीच्या राजाने सुरू केलेली ही 200 वर्षे जुनी परंपरा आहे. रामनगर किल्ल्याशेजारी सुंदर बांधलेल्या सेटवर प्रतिभावान कलाकार रामलीला सादर करतात. 

रामलीलामध्ये ,कलाकार संगीतबद्ध रामायण सादर करतात. दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून मुख्य चौकात रावणाच्या मोठ्या पुतळ्याचे दहन केले जाते.

काशी नगरीच्या राजाने सुरू केलेली ही 200 वर्षे जुनी परंपरा आहे

हिमाचल प्रदेश

कुल्लूमध्ये दसरा उत्सव विजयादशमीपासून सुरू होतो आणि सात दिवस चालतो. मोठ्या संख्येने भाविक विविध देवी-देवतांच्या मूर्ती डोक्यावर घेऊन प्रसिद्ध रघुनाथ मंदिराकडे जाणाऱ्या मिरवणुकीत सामील होतात. 

उत्सवाच्या शेवटच्या दिवशी, मिरवणूक नदीच्या दिशेने नेली जाते. जिथे लंका दहनाचे प्रतीक म्हणून लाकूड जाळले जाते. दसरा उत्सवादरम्यान आयोजित केलेल्या स्थानिक जत्रेत तुम्हाला कुल्लू येथील संस्कृतीची झलक देखील मिळू शकते.

दसरा उत्सव विजयादशमीपासून सुरू होतो आणि सात दिवस चालतो

दिल्ली

भारतातील दसरा उत्सवाचा विचार केला तर दिल्ली सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. दसऱ्याला संपूर्ण शहर नववधूप्रमाणे सजवले जाते. पण दसऱ्याच्या वेळी दिल्लीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामलीला मैदानावरील प्रसिद्ध रावण वध पाहणे होय. 

विजयादशमीच्या दिवशी येथे नाट्यप्रयोग होतात आणि भगवान रामाची कथा आणि त्याने रावणावर कसा विजय मिळवला हे सांगितले आहे. सर्वात लोकप्रिय रामलीला संगीत पाहण्यासाठी, तुम्ही जुन्या दिल्लीतील रामलीला मैदानावर जाऊ शकता.

रामलीला मैदानावरील प्रसिद्ध रावण वध

छत्तीसगड

छत्तीसगड राज्यातील बस्तर हे 75 दिवस चालणाऱ्या अनोख्या दसरा उत्सवासाठी खूप प्रसिद्ध आहे. बस्तरच्या आदिवासी समाजाची प्रमुख देवी दंतेश्वरीच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव आयोजित करण्याची परंपरा बस्तरचे राजा पुरुषोत्तम देव यांनी १३ व्या शतकात सुरू केली होती. या महोत्सवात शहरातील आदिवासी शैलीची झलक पाहायला मिळते. 

आजूबाजूच्या गावांतून अनेक देवतांना मिरवणुकीत दंतेश्वरी मंदिरात आणले जाते. या उत्सवामध्ये लाकडाची पूजा करणे, कलश स्थापित करणे, देवी कांचनासाठी सिंहासन स्थापित करणे, आदिवासी नेत्यांच्या हस्ते पूजा केली जाते. उत्सवाच्या शेवटी, भक्त सांस्कृतिक संगीत आणि नृत्य सादरीकरणाद्वारे त्यांच्या देवतांना निरोप दिला जातो.

आदिवासी समाजाची प्रमुख देवी दंतेश्वरीच्या सन्मानार्थ उत्सव होतो

गुजरात

नवरात्री आणि गुजरातचे एक अनोखे नाते आहे. दसरा आणि नवरात्रीच्या काळात गुजरात हे रंगीबेरंगी भारतीय राज्य खूप सुंदर दिसते. पण इथे सगळ्यात जास्त लक्ष एका गोष्टीवर आहे आणि ते म्हणजे गरबा नृत्य. गुजरातमधील या उत्सवाचा मुख्य उद्देश लोकांना जवळ आणणे आणि त्यांना रंगीबेरंगी कपडे परिधान करून दांडिया रात्रीमध्ये सहभागी करून घेणे हा आहे.

नवरात्री आणि गुजरातचे एक अनोखे नाते आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT