navratr festival  esakal
नवरात्र

Navratri 2022 : नवशक्तींचे नऊरंग: तिसरा दिवस-रंग शाही निळा!

शरद ऋतू म्हणजे सर्व ऋतूपैकी एक आगळा-वेगळा ऋतू

सकाळ वृत्तसेवा

शरद ऋतू म्हणजे सर्व ऋतूपैकी एक आगळा-वेगळा ऋतू . हा ऋतू सृष्टीत अनेक फेरबदल करून जातो. परतीचा पाऊस जायला लागतो आणि हळूच मागच्या दाराने सृष्टीमध्ये मस्त थंडीचा प्रवेश होतो. वृक्षवेली जुन्या पानांना निरोप देऊन नव्या नवलाई-पालवीला भेटण्यासाठी आतुर होतात! शारदीय काळात निसर्गात होणारा हा मनमोहक बदल संत तुलसीदासजी आपल्या श्री रामचरितमानस या ग्रंथात.

बरषा बिगत सरद ऋतु आई। लछिमन देखहु परम सुहाई॥

फूलें कास सकल महि छाई। जनु बरषाँ कृत प्रगट बुढ़ाई॥

हा अलंकारांनी ओतप्रोत भरलेला दोहा लिहितांना, "शरद ऋतूच्या माध्यमातून जणू प्रत्यक्ष वर्षाच धर्तीवर अवतरली आहे" याचा समारोप करतांना तुलसीदासजी "लो आ गई यह नव वधू-सी शोभती, शरद नायिका" लिहून शरद ऋतूतील सृष्टी म्हणजे अगदी नववधू सारखी सर्वांगसुंदर नायिके सारखी नटून थटून बागडते आहे.

अशा सर्वांगसुंदर शरद ऋतूमध्ये हा नवरात्रोत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जातो म्हणूनच त्याला शारदीय नवरात्रोत्सव म्हणतात. सृष्टीच्या सौंदर्याचा अलौकिक अविष्कार म्हणजे हा उत्सव! जगन्माता असलेल्या स्त्री शक्तीच्या सन्मानाचा हा आनंद-सोहळा. नवविचारांची रुजवणूक करणारा उत्सव. स्त्री स्वातंत्र्याचा आणि मुक्त संचार करण्याचा सर्वोच्च सोहळा म्हणजे हा नवरात्रोत्सव.      

नवरात्रोत्सवात श्री देवी म्हणजे मातृशक्ती विविध नामे आणि विविधरंगी वस्त्र धारण करून येत असते असे लोक संकेत आहेत. नऊ रंगात नव दिवस आलेल्या या मातृशक्ती म्हणजे नऊ दिवस होणारी नऊ रंगांची इंद्रधनुषी उधळण संपूर्ण सृष्टीला ललामभूत करून टाकते.आज श्री देवी चन्द्रघण्टा माता नावाने, शाही निळ्या रंगांचे वस्त्र परिधान करून आली आहे. आज तृतीय दिनी

पिण्डजप्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकैर्युता॥

प्रसादं तनुते मह्यं चन्द्रघण्टेति विश्रुता॥

मंत्राने चन्द्रघण्टा मातेचे स्तवन केले जाते. चन्द्रघण्टा म्हणजे कपाळी घंटा आकाराची चंद्रकोर असणारी देवीमाता. भाळावरील घंट्याच्या आकाराच्या चंद्रकोरीद्वारे माता संपूर्ण विश्वाला शांती आणि शितलतेचे दर्शन घडवते आहे,आशीर्वाद देते आहे. योग-प्राणायामाच्या दृष्टीने मणिपूर चक्र हे चन्द्रघण्टा मातेचे अधिष्ठान असून, मणिपूर चक्रावर मन एकाग्र करून चन्द्रघण्टा मातेची साधना केल्यास शरीरांत अलौकिक शक्तींचा संचार होतो. साधकाची अवस्था आत्मानंदी होते.

आज चन्द्रघण्टा मातेने शाही निळ्या रंगांचे वस्त्र परिधान केले आहे. निळा रंग म्हणजे निळे-विस्तीर्ण आकाश आणि विशालकाय  समुद्र. शाही निळा म्हणजे अधिकार, विश्वास, जबाबदारी, शौर्य, समर्पण, आत्मविश्वास, सहृदयता आणि स्वावलंबन. अथांग पसरलेला, एक तृतीयांश पृथ्वी व्यापून टाकलेला निळा समुद्र आणि सर्वच सृष्टीचं विशाल छत म्हणजेच निळे-निरभ्र आकाश. लेकराच्या डोक्यावर मायेचं पांघरून घालणारी माता आणि तिच्या उदरात संपूर्ण विश्वाचा निर्माता निर्माण करण्याची क्षमता असून याच ताकदीवर तीने संपूर्ण विश्व व्यापून टाकले आहे.

बऱ्याच माता-भगिनी आपल्या भाळी सौभाग्याचं लेणं चंद्रकोर धारण करतात. विविध कार्यक्रमांत पुरुषसुद्धा चंद्रकोर आकाराचा गंध कपाळी लावतात. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कपाळी चंद्रकोर आकाराचा गंध लावतात. चंद्रकोर भाळी लावणे म्हणजेच शरीरात शांती, संयम, शीतलतेचा संचार असणे! त्याचबरोबर बऱ्याच माता-भगिनींचा शाही निळा हा आवडता रंग आहे.

तेंव्हा ह्या रंगाचे वस्त्र परिधान करणे म्हणजे स्वावलंबन, अधिकार, विश्वास, जबाबदारी, शौर्य, समर्पण, आत्मविश्वास, सहृदयता इत्यादी गुणांचा अंगीकार करणे होय! तेंव्हा चला, इथल्या स्त्री शक्तीला सक्षम करण्याची शपथ घेऊ, तद्वतच स्त्री शक्तीने भाळी चंद्रकोरीने चंद्र-शितलता धारण करून प्रेमाचे सिंचन करून सृष्टीचे पोषण करावे.जय चन्द्रघण्टा माता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT