साबुदाणा वडा हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. अगदी सगळ्याचं उपवासाला साबुदाणा वडा हा घरोघरी आवडीने बनवला जातो. नवरात्र हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते.
नवरात्रीच्या उपवासात, लोक बहुधा फळे, बटाट्याची भाजी, साबुदाणा खिचडी खातात. पण या नवरात्रीत तोंडाची चव बदलण्यासाठी टेस्टी साबुदाणा वडा ट्राय करून पाहा. साबुदाणा खायला चविष्ट आणि आरोग्यदायी तर आहेच पण पचायलाही हलका आहे. चला तर मग जाणून घेऊया टेस्टी साबुदाणा वडा रेसिपी.
साहित्य
● साबुदाणा दोन वाटी
● तेल दीड वाटी
● उकडलेले बटाटे दोन
● हिरवी मिरची तिन ते चार
● कोथिंबीर
● मीठ चवीनुसार
● लाल मिरची पावडर
● शेंगदाणे अर्धा कप
कृती:
साबुदाण्याची वडा बनवण्यासाठी प्रथम साबुदाणा नीट धुवून घ्यावा आणि दोन ते तिन तास पाण्यात भिजत ठेवावा.
तसेच बटाटे दुसऱ्या बाजूला उकडण्यासाठी ठेवावे.
साबुदाणा चांगला भिजला आणि थोडा फुगला की त्याचे पाणी गाळून वेगळे करावे.
आता एका मोठ्या भांड्यात उकडलेले बटाटे घेऊन चांगले मॅश करून घ्यावे.
यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ आणि भिजवलेला साबुदाणा एकत्र करून घ्या.
आता कढईत तेल गरम करा.
आता तेलात साबुदाणा आणि बटाट्याच्या मिश्रणाने बनवलेल्या छोटे वडा सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
वडे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबत गरमागरम सर्व्ह करू शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.