Koyna Dam Tembu Takari Arfal Yojana esakal
पश्चिम महाराष्ट्र

Koyna Dam Water : पाणी टंचाईचं गडद संकट! कोयना धरणातून पुरवठ्यात 10 टक्के कपात; टेंभू, ताकारी, आरफळ योजनांवर मोठा परिणाम

कोयना धरणातील पाणी वाटपाचा नियोजन अहवाल राज्य शासनाकडे सादर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आमदार अनिल बाबर यांनी कोयना धरणातील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या वापराबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

सांगली : कोयना धरणातील (Koyna Dam) पाणी वाटपाचा नियोजन अहवाल राज्य शासनाकडे (Maharashtra Government) सादर केला आहे. त्यात सांगली जिल्ह्याच्या वाट्याच्या पाण्याला सुमारे १० टक्के कपातीचा सामना करावा लागणार आहे. त्याचा परिणाम टेंभू, ताकारी, आरफळ सिंचन योजनांवर होणार असून खासगी व सहकारी उपसा सिंचन योजनांनाही उपशावर मर्यादा येणार आहे.

पिण्याचे पाणी प्राधान्याने दिले जाणार आहे. या वर्षी कृष्णा खोऱ्यात टंचाईचे संकट गडद झाले आहे. कोयना धरण इतिहासात दुसऱ्यांदा ९० टक्क्यांपेक्षा कमी भरले आहे. या वर्षी धरण ९१ टीएमसीपर्यंत भरले होते. सध्याचा साठा ८९ टीएमसी आहे. म्हणजेच, ३१ ऑक्टोबरला १०५ टीएमसी साठा अपेक्षित असताना तो तब्बल १६ टीएमसी कमी आहे. त्यामुळे पाणी वितरणाचे अंतिम नियोजन करताना प्रत्येक टप्प्यावर कपातीचे संकट आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जून आणि जुलै २०२४ साठी १६.४० टीएमसी साठा राखीव ठेवला आहे. उर्वरित ७० टीएमसी पाण्यातून ३५ टीएमसी पाणी हे पूर्वेकडील सिंचन योजनांसाठी दिले जाईल, तर ३५ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाईल. या वर्षी पावसाळ्यात सुमारे ५ टीएमसी पाणी सिंचनासाठी वापरले असून २३ टीएमसी पाण्याचा वीज निर्मितीसाठी वापर केला आहे. त्यानुसार आता एकूण तूट ही सुमारे ११ टीएमसी असणार आहे.

आता कोयना धरण व्यवस्थापनाकडून जलसंपदा विभागाकडे वापर वाटपाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे १० टक्केपर्यंत कपातीची सूचना केली आहे. ती एक-दोन दिवसांत मान्य होईल, असे सांगण्यात आले. आता सांगली पाटबंधारे विभागावर या पाण्याच्या वाटपाचे धोरण ठरवण्याचे आव्हान असणार आहे. टेंभू योजनेवर (Tembu Yojana) अवलंबून शेती, कृष्णाकाठच्या उपसा सिंचन योजना आणि प्रमुख शहरांच्या पाणीपुरवठा योजना राबवताना पाण्याचे काटेकोरे नियोजन गरजेचे असणार आहे.

‘म्हैसाळ’ला चिंता नाही

म्हैसाळ उपसा सिंचन योजना ही चांदोली धरणावर अवलंबून आहे. म्हैसाळ योजनेसाठी ८.९६ टीएमसी पाणी राखीव आहे. हरिपूर संगमापासून खाली शेती योजनांसाठी ३ टीएमसी पाणी राखीव आहे. चांदोलीत ३४ टीएमसी साठा आहे.

वीजपुरवठ्याचे पाणी किती काळ वाया जाणार?

आमदार अनिल बाबर यांनी कोयना धरणातील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या वापराबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. विजेसाठी वापरात येणारे पाणी वाया जाते. ते टनेलद्वारे नदीकडे वळवण्याचा सुमारे दीडशे कोटींचा प्रकल्प प्रस्तावित आहे; मात्र त्यावर सरकार हालचाल करायला तयार नाही. हा प्रकल्प झाला असता तर कितीही मोठे संकट आले तर पाणी कपातीची वेळ आली नसती, असा दावा केला आहे. किमान या संकटातून तरी धडा घेतला पाहिजे, अशी भावना आता व्यक्त होतेय.

कोयना धरण पाणी नियोजनाचा अहवाल आम्ही राज्य शासनाकडे सादर केला आहे. धरण शंभर टक्के भरले नसल्याने पाणी कपातीचा प्रस्ताव आहे.

-नीतेश पोतदार, कार्यकारी अभियंता, कोयना

कोयनेतून दिल्या जाणाऱ्या पाण्यात या वर्षी तूट असेल, मात्र त्याचे काटेकोर नियोजन पाटबंधारे विभागाकडून केले जाईल.’’

-चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे

हे परिणाम होतील

  • - सिंचन योजनांखाली पाटपाण्यावर ऊस घेण्यास बंदी शक्य

  • - ठिबक सिंचनाचा सक्तीने वापर गरजेचे ठरेल

  • - उपसा योजना उशिराने सुरू होतील, आवर्तनांची फेररचना शक्य

  • - नदी प्रदूषणाला जबाबदार घटकांबाबत कठोर निर्णयाची हीच वेळ

  • - चांदोली शंभर टक्के भरल्याने म्हैसाळवर फार परिणाम नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT