10 years of people's struggle finally wins: primary health center will come to Alsand 
पश्चिम महाराष्ट्र

आळसंदवासियांच्या १० वर्षांच्या लढ्याला अखेर यश : 15 गावांचा आरोग्याचा प्रश्‍न सुटणार

दीपक पवार

आळसंद : विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंद (ता.खानापूर, जि. सांगली) येथे स्थलांतरित करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिलेल्या लढ्यास अखेर दहा वर्षानंतर यश आले आहे. यामुळे आळसंदसह परिसरातील पंधरा गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. याबाबतचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचे पत्र ग्रामपंचायतीस प्राप्त झाले आहे. पत्र मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. 

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी एक डिसेंबरला गावास भेट देऊन आरोग्य केंद्र सुरु करण्याबाबत पाहणी केली होती. ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरुपात चार खोल्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. या ठिकाणी विटा प्राथमिक आरोग्य केंद्राकडील बाह्य रुग्ण तपासणी, स्री रुग्ण तपासणी व प्रसूतीसाठी आळसंद येथील आरोग्य उपकेंद्रातील प्रसूती खोल्या वापरात आणाव्यात तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेकरिता आळसंद येथे ऑपरेशन थिएटर उपलब्ध होईपर्यंत विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात याव्यात, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती विटा (खानापूर), तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र व सरपंच ग्रामपंचायत आळसंद यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. 

केंद्र सुरू व्हावे यासाठी परिसरातील 15 गावांनी ग्रामस्थांच्या आरोग्य सेवेच्या दृष्टीने विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर करुन आळसंद येथे सुरु करण्यात यावे, अशी मागणी संबंधित ग्रामंपंचायतींच्या सरपंचांनी ठरावाद्वारे केली होती. मात्र, आळसंद येथे आरोग्य केंद्र सुरु करण्याबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे आळसंद ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच इंदूमती जाधव व माजी उपसरपंच नितीन जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 

या गावांना होणार फायदा... 
आळसंद , बलवडी (भा.), तांदळगाव, खंबाळे (भा.), वाझर, जाधवनगर, भाळवणी, कमळापूर , पंचलिंगनगर, कंळबी ढवळेश्वर, मेंढ, उमरकांचन यासह अन्य गावांना फायदा होणार आहे. 

ग्रामस्थांच्या लोक लढ्याला यश

विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंदला स्थलांतरित करण्याचा घेतला निर्णय स्वागर्तह आहे. ग्रामस्थांच्या लोक लढ्याला यश आले आहे. 
- इंदुमती जाधव, सरपंच, आळसंद. 

संपादन : युवराज यादव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT