पश्चिम महाराष्ट्र

सांगली - वाळव्यात 11 फुटी मगरीचा मृत्यू; कारण मात्र अस्पष्ट

कृष्णा नदीत ठिकठिकाणी बंधाऱ्यांच्या पट्ट्यात मगरींचा अधिवास आहे.

अजित झळके

कृष्णा नदीत ठिकठिकाणी बंधाऱ्यांच्या पट्ट्यात मगरींचा अधिवास आहे.

वाळवा : नागठाणे (ता. पलूस) येथे कृष्णा नदीत बंधाऱ्याच्या दक्षिण बाजूला पूर्ण वाढ झालेली सुमारे 11 फूट लांबीची मगर मृत अवस्थेत आढळून आली. वनविभागाने पंचनामा करून शवविच्छेदन केले आहे. मगरीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतू, प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले की दोन नगर मगरींची काल भांडणे सुरु होती. त्यातून या मगरीचा मृत्यू झाला असावा. कारण, सध्या मगरींचा प्रजनन काळ सुरु आहे. या माहितीची शहानिशा केली जाईल, असे विन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  

कृष्णा नदीत ठिकठिकाणी बंधाऱ्यांच्या पट्ट्यात मगरींचा अधिवास आहे. नागठाणे येथील बंधाऱ्याजवळही मगरींचा अधिवास खूप वर्षांपासून आहे. येथे पाच ते सात मगरींचे दर्शन नेहमीच होत असते. काही वर्षांपूर्वी येथून एका मुलाला मगरीने ओढून नेले होते. त्यामुळे या परिसरात जाताना लोकांमध्ये नेहमीचे भितीचे वातावरण राहिले आहे. आज सकाळी मृतावस्थेत मगर आढळल्याने गावकरी नदीकाठी धावले. तेथे वन विभागाचे अधिकारी तातडीने आले. त्यांनी मगर ताब्यात घेऊन पंचनामा केला. शवविच्छेदन करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT