Anganwadi 
पश्चिम महाराष्ट्र

पन्हाळ्यात १४७ अंगणवाड्या इमारतीविना

सागर चौगले

माजगाव - खऱ्या अर्थाने शैक्षणिक जडणघडणीचा पाया अंगणवाडीत रचला जातो. डिजिटल अंगणवाड्यांद्वारे बालशिक्षणातील आधुनिक प्रवाहांची जोड देण्याचे प्रयत्न शासन स्तरावरून सुरू आहेत; मात्र पन्हाळा तालुक्‍यातील ३३७ पैकी १४७ अंगणवाड्यांना स्वतंत्र अशा इमारतीच नाहीत. 

येथील अंगणवाड्यांच्या बांधकामाकडे ग्रामपंचायतीसह शासन यंत्रणेनेही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे इमारतीविना शिक्षणाचे धडे घेणाऱ्या अंगणवाड्यांतील बालशिक्षणासह आरोग्याचाही प्रश्‍न गंभीर बनला आहे. 

अंगणवाड्यांना इमारत नसल्याने मिळेल तिथे भाड्याच्या खोलीत, देवळात, सहकारी संस्थेच्या इमारतीमध्ये अंगणवाड्या भरवल्या जात आहेत.

एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत तालुक्‍यात ३३७ अंगणवाड्यांपैकी फक्त १८९ अंगणवाड्यांना स्वतःची स्वतंत्र इमारत आहे. ६४ अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरतात. यासाठी २०० रुपये मासिक भाडे शासनाकडून देण्याची तरदूत आहे. ३४ वर्ग देवळात व समाज मंदिरात भरवले जातात. १८ अंगणवाड्यांतील मुले ग्रामपंचायत इमारतीत आणि ३२ वर्ग प्राथमिक शाळेतील इमारतीमध्ये बसवले जातात. यंदा नवीन ५ इमारतींसाठी निधी मंजूर झाला आहे.

यांतील बऱ्याच इमारती पावसाळ्यात गळतात, थंडी वाजते व ओल येते. अशा धोकादायक व अपुऱ्या प्रकाशमान जागेत मुले शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. सार्वजनिक किंवा खासगी जागेत मुलांचा आहार शिजविणे, शारीरिक विकासासाठी तालबद्ध हालचाली, नृत्य-अभिनयगीते शिकविण्यात सेविकांना संकोच वाटणे, शिकवताना व्यत्यय येणे हे नैसर्गिक असल्याने त्याचा थेट परिणाम मुलांच्या सुरक्षा व आरोग्यावर जाणवतो आहे. 

निधी आहे...जागा नाही -
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत नवीन अंगणवाडीची इमारत बांधण्यासाठी निधी मंजूर केला जातो. यासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून प्रस्ताव सादर करावा लागतो; पण काही गावांत रिकामी जागा उपलब्ध नसल्याने निधी परत जातो. मग मिळेल त्या ठिकाणी अंगणवाडीचे वर्ग भरवावे लागत आहेत.

स्वतंत्र इमारत नसल्याने विद्यार्थ्यांचे मन विचलित होते. बालकांना शिकवताना अडचणी येतात. तसेच भिंती चित्राद्वारे मुलांना शिक्षण देता येत नाही.
- व्ही. एस. माजगावकर, अंगणवाडी सेविका, माजगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT