170 bogas doctor in belgaum health department list announcement of fake doctors police  sakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum News : बेळगाव जिल्ह्यात १७० बनावट डॉक्टर; आराेग्य विभागाला जाग, यादी जाहीर

राज्यात एकूण १,४३६ बनावट डॉक्टर असून, त्यापैकी बेळगाव जिल्ह्यात १७० जण आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : खासगी दवाखान्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले असून, खात्याच्यावतीने राज्यातील बनावट डॉक्टरांची यादी जाहीर केली आहे. राज्यात एकूण १,४३६ बनावट डॉक्टर असून, त्यापैकी बेळगाव जिल्ह्यात १७० जण आहेत.

राज्यात सर्वाधिक ४२३ बनावट डॉक्टर बिदर जिल्ह्यात आहेत. राज्यात गेल्या २०-३० वर्षांपासून काही बनावट डॉक्टरांनी दवाखाने उघडून कोट्यवधींची माया जमवली आहे. अशा डॉक्टरांकडून उपचार करून घेतलेल्या काहीजणांना प्राण गमवावे लागले आहेत.

प्रत्येक जिल्ह्यात बनावट डॉक्टरांनी विविध ठिकाणी दवाखान्यांच्या रूपाने दुकाने थाटली आहेत. आरोग्य खात्याच्या वतीने त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.

काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दरमहा या डॉक्टरांकडून ठराविक हप्ता दिला जात असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. जिल्हा कार्यक्षेत्रात हे डॉक्टर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नेहमीच संपर्कात राहत असून, आपल्यावर कारवाई होऊ नये, यादृष्टीने पुरेपूर काळजी घेत असतात.

आयुष खात्यातील काही वरिष्ठ अधिकारी एकाच जिल्ह्यात अनेक वर्षे ठाण मांडून आहेत. केएमयूपीमध्ये नोंदणी करून घेतल्यास डॉक्टरांना परराज्यात किंवा परदेशात जावे लागल्यास किंवा त्यांचे निधन झाल्यास त्यांची नोंदणी रद्द होते.

आपला नोंदणी क्रमांक अन्य डॉक्टरांना देण्याची परवानगी नाही; परंतु, काही जिल्ह्यांत रजिस्ट्रारद्वारे या नोंदणी क्रमांकाचा वापर करून बनावट डॉक्टरांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघड झाले आहे. यासाठी चार ते पाच लाख रुपये लाच स्वीकारली जात असल्याचा आरोप होत आहे.

या संदर्भात आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून, बनावट डॉक्टरांवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने संबंधितांच्या दवाखान्यांसमोर ‘बनावट’ असा (काळ्या रंगातील) मोठ्या अक्षरातील फलक लावावा, अशी सूचना केली आहे.

या आधीही अशा बनावट डॉक्टरांविरोधात वेळोवेळी कारवाई केली असली तरी असे प्रकार कमी झालेले नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे फलक लावण्याचा नवा उपाय हाती घ्यावा, अशी सूचना आरोग्य खात्यास केली आहे.

जिल्‍ह्यातील बनावट डॉक्टरांविरुद्ध आरोग्य खात्याच्यावतीने कारवाई हाती घेतली आहे. अशा डॉक्टरांना पाठीशी घालताना खात्यातील अधिकारी आढळून आल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई होणार आहे. याबाबत आरोग्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत.

- डॉ. महेश कोणे, जिल्हा आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT