39 teachers death caused by a corona positive in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात कोरोनामुळे 39 शिक्षकांचा मृत्यू

मिलींद देसाई

बेळगाव : कोरोनामुळे बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 39 शिक्षकांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्येही दिवसेंदिवस कोरोनाची भिती वाढत असुन बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 22 तर चिक्‍कोडी शैक्षणिक जिल्ह्यात 17 शिक्षकांना, कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर मार्च महिन्यापासुन शाळा बंद आहेत. मात्र शिक्षकांना विविध प्रकारची कामे करावी लागत आहेत. त्यामुळे शिक्षकांना शाळेत जाण्यासह विद्यागम योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना गावागावात जाऊन शिकवावे लागत आहे. 

सुरुवातीपासुनच शिक्षकांनी कोरोना काळात शाळा सुरु करु नयेत तसेच शिक्षकांना विमा कवच द्यावे अशी आग्रही मागणी केली होती. मात्र शिक्षण खात्याने सरकारी व अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करीत विविध प्रकारच्या प्रशिक्षणाला हजर राहण्याची सुचना केली होती. त्यानुसार शिक्षक प्रशिक्षणला उपस्थित होते. मात्र प्रशिक्षणाबाबत शिक्षकांमधुन तीव्र नाराजीचा सुर उमटत होता. तरीही प्रशिक्षण आणि विद्यागम योजना सुरु ठेवल्यामुळे अनेक शिक्षकांना त्रास सहन करावा लागला असा आरोप शिक्षकांमधुन होत आहे.

शिक्षण खात्याच्या माहितीनुसार एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत बेळगाव जिल्ह्यात सध्या सेवेत कार्यरत असलेल्या एकुण 40 शिक्षकांचा मृत्यु झाला आहे. यापैकी 39 शिक्षक कोरोनाने तर 1 शिक्षकांचा इतर आजाराने मृत्यु झाला. शिक्षण खात्याने मृत्यु झालेल्या शिक्षकांची माहिती संकलीत केली. त्यानुसार बेळगाव शैक्षणिकमध्ये 22 तर चिक्‍कोडीमध्ये 17 शिक्षकांचे निधन झाले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्येही कोरोबाबाबत अधिक प्रमाणात भिती पहावयास मिळत आहे. शिक्षण खात्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेताना योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. 

शिक्षण खात्याकडुन आलेल्या सुचनांचे शिक्षकांना पालन करावे लागते. मात्र शिक्षकांनी आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्‍यक असुन कोरोनामुळे मृत्यु झाल्यास कोणत्याही प्रकारची अतिरिक्‍त मदत सरकारकडुन केली जात नाही याची दखल घेत शिक्षकांनी कार्यरत राहणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्‍त होत आहे. 

"बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 39 शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. बेळगाव शैक्षणिक जिल्हातील शिक्षकांची माहिती संकलीत करण्यात आली आहे. शिक्षकांना सुरुवातीपासुनच कोरोनाबाबत खबरदारी घ्या अशी सुचना करण्यात आली आहे. कोरोनाची लागन होऊ नये यासाठी सर्व शिक्षकांनी काळजी घ्यावी."

- ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT