Sangli Guardian Minister Suresh Khade esakal
पश्चिम महाराष्ट्र

Suresh Khade : 'अवकाळी'चा सांगलीला तडाखा, 4 हजार हेक्टर शेतीक्षेत्र बाधित; मिरज, तासगाव, जतला मोठा फटका

जिल्ह्यात सलग तीन दिवस अवकाळीमुळे द्राक्ष, ज्वारी, दोडका, आंबा, पपईसह अन्य पिकांचे नुकसान झाले.

सकाळ डिजिटल टीम

मिरज, तासगाव, जत, कवठेमहांकाळ येथील पिकांना अवकाळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. ४ हजार २३९ हेक्टर नुकसानग्रस्त आहे.

मिरज : मागील तीन दिवसांत जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) ४ हजारांहून हेक्टर अधिक शेतीक्षेत्र बाधित झाले आहे. याबाबत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पालकमंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी पत्रकार बैठकीत दिली.

तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर पत्रकार बैठकीत पालकमंत्री श्री. खाडे बोलत होते. मंत्री खाडे म्हणाले, जिल्ह्यात सलग तीन दिवस अवकाळीमुळे द्राक्ष, ज्वारी, दोडका, आंबा, पपईसह अन्य पिकांचे नुकसान झाले. यामध्ये मिरज, तासगाव, जत, कवठेमहांकाळ येथील पिकांना अवकाळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. ४ हजार २३९ हेक्टर नुकसानग्रस्त आहे.

यामध्ये द्राक्ष ४ हजार १३० हेक्टर, आंबा ४५ हेक्टर, पपई १० हेक्टर, रब्बी ज्वारी ५४ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त आहे. गतवर्षी २ हेक्टरप्रमाणे दिलेली भरपाई यंदा ३ हेक्टरप्रमाणे दिली जाणार आहे. यामध्ये कोरडवाहूसाठी ८ हजार ५०० प्रतिहेक्टर, बागायत क्षेत्रासाठी १७ हजार प्रतिहेक्टर, तर फळपिकासाठी २२ हजार ५०० प्रतिहेक्टरप्रमाणे संदर्भात दिली जाणार आहे. कोंगनोळी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी गुंडा लक्ष्मण वावरे यांच्या कुटुंबास भेट देऊन सांत्वन केले.

‘जनरल मोटर्स’च्या कामगारांचे प्रश्न न्यायप्रविष्ट

पुण्यातील ‘जनरल मोटर्स’च्या कार्यालयासमोर गुरुवारी (ता. ३०) कामगार संघटनेकडून करण्यात आलेले आंदोलन राजकीय हेतूने झालेले आहे. यामध्ये काही जणांकडून राजकारण सुरू केले जात आहे. यामुळे कामगारांचे नुकसान होईल. कामगारांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. घेतलेले निर्णय नियमानुसार आहेत. कामगारांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. न्यायालयाकडून दिलेला निर्णय अंतिम असेल. यापूर्वी कामगारांची उद्योग मंत्री, कामगार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली आहे, तरीही काही जणांकडून गैरसमज निर्माण करून कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

'PM मोदी उठता-बसता बाळासाहेबांचं नाव घेतात आणि उद्धव ठाकरेंच्याच पाठीत खंजीर खुपसतात'; प्रियांका गांधींचा हल्ला

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Panchang 17 November: आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

Latest Maharashtra News Updates : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन

SCROLL FOR NEXT