शिवसेनेच्या ६७ हुतात्म्यांना अभिवादन  sakal
पश्चिम महाराष्ट्र

संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी ६७ शिवसैनिकांनी बलिदान दिले.

सीमाप्रश्नाच्या लढ्यात शिवसेनेने दिलेले योगदान कधीही विसरण्यासारखे नाही.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव: संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी ६७ शिवसैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेतूनच आजही सीमावासीयांचा लढा सुरू आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आहे. त्यामुळे सरकारने आता आक्रमक होऊन सीमाप्रश्नाची सोडवून करून सीमावासीयांना न्याय मिळवून द्यावा, असे मत मध्यवर्ती समिती सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले.

शिवसेना आणि सीमावासीयांतर्फे मंगळवार (ता.८) शिवसेनेच्या ६७ हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. रामलिंगखिंड गल्ली येथील सम्राट अशोक चौकात अभिवादनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी श्री अष्टेकर बोलत होते.

सीमाप्रश्नाच्या लढ्यात शिवसेनेने दिलेले योगदान कधीही विसरण्यासारखे नाही. बलिदान देवून शिवसैनिकांनी संयुक्त महाराष्ट्राप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली आहे. आजही आमचा लढा त्याच जोमाने सुरू आहे. कर्नाटक सरकारकडून दिवसेंदिवस दबाव वाढवला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता आक्रमक होणे आवश्यक असून आहे. तसेच सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट झाल्यास हीच हुतात्म्यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, यांच्यासह इतर मान्यवरांनी स्मारकाचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, सरिता पाटील, नगरसेवक रवि साळुंखे, शिवाजी मंडोळकर, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, सुधा भातकांडे, वर्षा आजरेकर, दिलीप बैलूरकर, राजकुमार बोकडे, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, अंकुश केसरकर, किरण गावडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, राजू तुडयेकर, तानाजी पावशे, विश्वनाथ सूर्यवंशी, सुहास किल्लेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT