अमरसिंह देशमुख sakal
पश्चिम महाराष्ट्र

आटपाडी : शुध्द पाणी विट्याला लागते; आटपाडीला का नको?

अमरसिंह देशमुखः धनगाव योजना राजकारणातून बंद पाडल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

आटपाडी : आटपाडी तालुक्यासाठीची १११ कोटीची धनगाव पाणी योजना ९५ टक्के पूर्ण झल्यानंतर बंद पाडली जाते. विट्याला शुध्द पाणी लागते आटपाडीला लागत नाही का असा सवाल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आज केला . आटपाडी येथील संत सावता माळी महाराज मठासमोर 'क' वर्ग तीर्थक्षेत्र देवस्थान विकास योजनेतून झालेल्या सभामंडपाच्या कामाचा प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. या योजनेचे काम रेंगाळण्यामागे विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्याकडे बोट दाखवत त्यांना अनुल्लेख केला मात्र सत्ता आटपाडीकडे त्यासाठीच हवी असे सांगत त्यांनी आगामी रणसंग्रामाची दिशाही स्पष्ट केली.

खानापूर विधानसभा मतदारसंघात आटपाडी तालुक्यांचा समावेश आहे. या दोन तालुक्यातील नेत्यांमध्ये प्रांत-पक्ष, जात असे मुद्दे उपस्थित करीत नेहमीच राजकीय डाव प्रतिडाव खेळले जातात. मुळचे राष्ट्रवादीचे असलेले देशमुख गेल्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपमध्ये आहेत. मुळचे राष्ट्रवादीचेच असलेले बाबर गेली दोन टर्म शिवसेनेच आमदार आहेत. तर या मतदारसंघातील आटपाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे गोपीचंद पडळकर आता भाजपचे विधान परिषद आमदार झाले आहेत.

तर दोनवेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे सदाशिवराव पाटील आता राष्ट्रवादीत गेले आहेत. तर अमरसिंह देशमुख यांची पवार निष्ठ अशी ओळख आजही कायम आहे. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकांतील मैदान कसे याबद्दल दोन्ही तालुक्यात कुतूहल आहे. धनगाव योजनेच्या मुद्यावरून यापुढे पुन्हा एकदा राजकारण तापणार आहे याचे संकेतच आता मिळाले आहेत. काही वक्त्यांच्या धनगाव योजनेबाबत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगाने श्री देशमुख म्हणाले,‘‘ जिल्हा परिषद अध्यक्ष असताना भिषण दुष्काळी स्थितीत ही योजना मंजूर करून आणली. शुद्धीकरण यंत्रणा उभी आहे. पंपाची चाचणीही झालीय. मात्र काहींनी योजनेचे काम हेतूपुर्वक बंद पाडलेय. तेही केवळ अमरसिंहने योजना मंजूर करून आणली म्हणून अनेक जण म्हणतात टेंभूचे पाणी आले असताना आता योजनेची गरज काय? हा मुद्दा योजना मंजूरीवेळी सचिवांनी बैठकीत मांडला होता.

तेव्हा मी टेंभूचे शेतीसाठीचं पाणी पिण्यास योग्य आहे का असं अधिकाऱ्यांना विचारलं. आज तोच प्रश्‍न माझा त्यांनाही आहे. स्वच्छ -शुध्द पाणी आपला हक्क नाही का? तुम्हीही २०० कोटीची योजना आणा आणि गाजावाजा करा. पण हे राजकारण योग्य नव्हे. टेंभूचे जनक म्हणवून घेता पण मग पाणी कुठे आहे? यासाठीच आटपाडी तालुक्याकडे सत्ता हवी. मग तो कोणीही असो. विटयाला फिल्टरचे स्वच्छ पाणी लागते मग आटपाडी तालुक्याला का नको याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात सकाळी 9.00 वा. पर्यंत 7.38 टक्के मतदान

Traffic Update: मतदारांची गावी जाऊन मतदान करण्यासाठी धडपड; मात्र वाहतूक कोंडीचं विघ्न, मुंबई-गोवा महामार्गावर लांबच लांब रांगा

Chatrapati Sambhajinagar Assembly Election : मतदार संख्येत भर; शाई वाढली, मतदान केंद्रांना तब्बल ७ हजार २०० बाटल्यांचा पुरवठा

Nashik Vidhan Sabha Election : बालेकिल्यात मंत्री छगन भुजबळ यांनी कुटुंबीयांसमवेत प्रथमच बजावला मतदानाचा हक्क

प्राजक्ता माळी ते सोनाली कुलकर्णी, मराठी कलाकारांनीही बजावला मतदानाचा हक्क; शेअर केले फोटो

SCROLL FOR NEXT