education Sakal
पश्चिम महाराष्ट्र

2022 - 23 चे शैक्षणिक वर्ष शिक्षण जागृती वर्ष म्हणून ओळखले जाणार

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे या वर्षी लवकर शाळा सुरू करून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे.

मिलिंद देसाई

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे या वर्षी लवकर शाळा सुरू करून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे.

बेळगाव - कोरोनाच्या संकटामुळे (Corona Crisis) गेली २ वर्षे शैक्षणिक वर्षाला (Educational Year) सुरवात होण्यास विलंब झाला होता. मात्र २०२२ - २३ च्या शैक्षणिक वर्षाला लवकर सुरवात होणार असून नवीन शैक्षणिक वर्षाला शिक्षण जागृती वर्षं (Education Awareness Year) म्हणून ओळखले जाणार आहे. तसेच मागील व नवीन शिक्षण पध्दतीची विद्यार्थ्यांना ओळख निर्माण करून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे या वर्षी लवकर शाळा सुरू करून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. तसेच या शैक्षणिक वर्षात १८ महिन्यांवरील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आवड निर्माण करण्यासाठी त्यांना पाठ्यपुस्तक उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार असून प्रत्येक विषयाच्या पेपरची पन्नास पानांची पुस्तिका शिक्षकांना दिली जाणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी पुस्तकांच्या छपाईचे काम वेगाने हाती घेण्यात आले असून पाठ्यपुस्तके वितरणासाठी शिक्षण खात्याने संबंधित अधिकाऱ्यांना नियोजन करण्याची सूचना केली आहे.

नवीन पुस्तकं बाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकां बरोबरच वर्कशीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन शिक्षण पद्धतीबाबत पालकांना योग्य ती माहिती देणे गरजेचे असून विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी शिक्षण जागृती वर्षात दर महिना विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा सूचनाही शिक्षण खात्यातर्फे करण्यात आल्या आहेत.नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पाटे पुस्तकांसह गणवेश उपलब्ध करून दिला जाणार असून माध्यान्ह आहार देखील पहिल्या दिवसापासून उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. तसेच दोन वर्षे इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या. मात्र यावेळी सायकल वितरणाचा निर्णय ही शिक्षण खात्याकडून घेतला जाणार आहे. तसेच दसरा सुट्टीमध्ये हि कपात केली जाणार असून प्रतिभा कारंजी, समुदाय दत्त आदी कार्यक्रमांचे शाळेत आयोजन करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC Points Table: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावला 'नंबर वन'चा मुकूट; पर्थमधील विजयानंतर कसे आहे फायनलचे समीकरण?

Latest Marathi News Updates : युतीला एवढी मते मिळण्याची ही पहिलीच वेळ; काय म्हणाले खासदार सुनील तटकरे?

"आम्हाला आई-बाबा म्हणून निवडलंस" लेकाच्या दहाव्या वाढदिवशी रितेश-जिनिलियाने दिल्या खास शुभेच्छा , "एक उत्तम मुलगा..."

CERC Recruitment 2024: भारत सरकारने जाहीर केली नवीन भरती, 29 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

SCROLL FOR NEXT