Koyna Dam Electricity esakal
पश्चिम महाराष्ट्र

कोयना धरण प्रकल्पातून जादा वीजनिर्मिती होणार? वेळेत पाऊस झाला नाही, तर विजेची मागणी वाढण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

गेल्या वर्षी अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यासाठी पाच टीएमसी पाणीसाठा वाढवून देण्यात आला होता.

चिपळूण : राज्यात उष्णतेची लाट (Heat Wave) अतितीव्र झाल्याने विजेची मागणी तब्बल ५ हजार मेगावॉटने वाढली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या जनतेने दिवसरात्र पंखे व कुलर सुरू ठेवल्याने हा भार महावितरणवर (Mahavitaran) पडला आहे. मे महिन्यात विजेची मागणी २४ हजार ८६० मेगावाॅटवर गेली आहे. वेळेत पाऊस झाला नाही, तर विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

त्या वेळी कोयना प्रकल्पातून (Koyna Dam Project) अतिरिक्त वीजनिर्मिती करण्याची वेळ येऊ शकते. राज्यात ज्या वेळी विजेची मागणी वाढली त्या त्या वेळी कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यात आली आहे. मागील सलग तीन वर्षे कोयनेतून अतिरिक्त वीजनिर्मिती (Power Generation) केली जात आहे. गेल्या वर्षी अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यासाठी पाच टीएमसी पाणीसाठा वाढवून देण्यात आला होता. यावर्षी वीजनिर्मितीच्या कोट्यातील आठ टीएमसी पाणीसाठा कमी करण्यात आला आहे.

आठ टीएमसी पाणी सिंचनासाठी सोडले जात आहे. त्यानंतरही महिन्यात पुरेशी वीजनिर्मिती व्हावी, याचे नियोजन कोयना प्रकल्पाने केले आहे. राज्यात २२ हजार मेगावॉटइतकी विजेची गरज भासते. दरवर्षीच्या उन्हाळ्यात साधारणपणे १ हजार ते १२०० मेगावॉटइतकी अतिरिक्त वीज वापरली जात होती; मात्र, यंदाचा उन्हाळा महाउष्ण असल्याने कोकणसह मध्य महाराष्ट्र, या भागांत ही मागणी जवळपास दुपटीने वाढली आहे.

महानिर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ज्या पद्धतीने सूचना येईल, त्या पद्धतीने वीजनिर्मिती केली जाईल. कोयना धरणातील अतिरिक्त पाणीसाठा विविध निर्मितीसाठी मिळाला तर याही वेळी अतिरिक्त निर्मिती करू.

-संजय चोपडे, मुख्य अभियंता, महानिर्मिती कंपनी, पोफळी

वीजनिर्मिती आणि उपलब्धता (मेगावॉट)

  • एमएसपीजीएसएल थर्मल ७७८५

  • एनटीपीसी ४४१४

  • एपीएमएल २६०८

  • जेएसडब्ल्यू २७०

  • सीजीपीएल ५९०

  • सोलार २५५८

  • को-जनरेशन ३४९

  • एमएसजीजीसीएल (गॅस) २६१

  • आरआयपीएल १३३०

  • पवनऊर्जा ४१२

  • कोयना ८९३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT