All failed in the councilor exam ahmednagar news 
पश्चिम महाराष्ट्र

(व्हिडीओ) : स्वीकृत नगरसेवकाच्या परीक्षेत सारेच नापास

अमित आवारी

नगर : महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी दाखल झालेली पाचही नामनिर्देशपत्रे शुक्रवारी (ता.10) झालेल्या महासभेत अपात्र ठरली. त्यामुळे महिनाभराने पुन्हा स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी महासभा बोलाविण्याचा निर्णय महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जाहीर केला. 

स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना व "राष्ट्रवादी'कडून प्रत्येकी 2, तर भाजपकडून एक नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. मात्र, धर्मादाय आयुक्‍त कार्यालयात सामाजिक संस्था म्हणून नोंद असलेल्या संस्थेचा सदस्य व त्या संस्थेत पाच वर्षे काम केल्याचा पुरावा सादर न केल्याने सारेच अर्ज अपात्र ठरविण्याची शिफारस जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी केली. त्यानुसार महापौर वाकळे यांनी सारेच अर्ज शुक्रवारी (ता.10) अपात्र ठरविले.

तेरा महिन्यांपासून निवड रखडली

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन 13 महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही स्वीकृत नगरसेवकांची निवड झालेली नाही. लोकसभा व विधानसभेची रणधुमाळी शमल्यावर महापौर वाकळे यांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी शुक्रवारी महासभा बोलाविली. महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्येनुसार शिवसेना व "राष्ट्रवादी'चे प्रत्येकी 2, तर भाजपचा एक स्वीकृत नगरसेवक होणार आहे. त्यानुसार गुरुवारी (ता.9) सायंकाळी 6 वाजेपर्यंत तिन्ही पक्षांच्या गटनेत्यांनी स्वीकृत नगरसेवकांची नामनिर्देशनपत्रे बंद लिफाफ्यात महापालिकेचे नगरसचिव एस. बी. तडवी यांच्याकडे सादर केली. त्यात शिवसेनेकडून संग्राम शेळके व मदन आढाव, "राष्ट्रवादी'कडून बाबासाहेब गाडळकर व विपूल शेटिया, तर भाजपकडून रामदास आंधळे यांनी अर्ज सादर केले. 

नामनिर्देशनपत्रांची छाननी

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी गुरुवारी रात्री साडेसात वाजता नगरसचिव तडवी यांना नामनिर्देशनपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेतले. नामनिर्देशनपत्रांची छाननी केली असता, सर्व अर्ज अपूर्ण असल्याचे आढळून आले. तसा अहवाल शुक्रवारी (ता.10) झालेल्या महासभेत जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी मांडला. कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे पाचही अर्ज नाकारण्याची शिफारस केली. 

जिल्हाधिकाऱ्यांची शिफारस महासभेकडून मान्य

दरम्यान, द्विवेदी यांच्या शिफारसीवर नगरसेवक अनिल शिंदे, भाजप गटनेते स्वप्निल शिंदे, "राष्ट्रवादी'चे गटनेते संपत बारस्कर, नगरसेवक योगीराज गाडे, सुरेखा कदम, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे यांनी आक्षेप घेतला. कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी काही अवधी देण्याची मागणी केली. मात्र, गुरुवारी (ता.9) सायंकाळपर्यंतच अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. आता पुन्हा वेळ दिला जाऊ शकत नाही. माझ्या शिफारसीवर निर्णय घेण्याचा अधिकार महासभेला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांची शिफारस मान्य करीत, महापौर वाकळे यांनी पाचही अर्ज अपात्र ठरविले. तसेच स्वीकृत नगरसेवकपदासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना करीत, महिनाभरात पुन्हा महासभा घेण्याचा निर्णय जाहीर केला. 

कार्यकर्त्यांची गर्दी नि वकिलांची फौज

स्वीकृत नगरसेवकपदासाठी सुचविलेल्या नावांवरून भाजप व शिवसेनेतील कार्यकर्त्यांत मोठ्या प्रमाणात नाराजी होती. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी थेट प्रदेश कार्यकारिणीकडेच याबाबत उघड नाराजी व्यक्‍त केली होती. शिवसेनेचे काही कार्यकर्तेही स्वीकृत नगरसेवक जाहीर होताच, उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत होते. त्यामुळे महापालिकेच्या आवारात शुक्रवारी सकाळपासून कार्यकर्ते व वकिलांची गर्दी होती. पाच स्वीकृत नगरसेवकपदासाठी सुचविलेली नावे अपात्र झाल्याचे समजताच त्यांचे समर्थक कार्यकर्ते निराश मनाने परतले. तिन्ही राजकीय पक्षांचे नेते, वकिलांचा ताफा घेऊन उशिरापर्यंत चर्चा करीत होते. 

कागदपत्रे अपूर्ण

स्वीकृत नगरसेवक पदासाठी पाचही उमेदवारांनी सामाजिक संस्थांत नाव असल्याचा व त्या संस्थेत पाच वर्षे काम केल्याचा पुरावा सादर केला नाही. त्यांनी दोन वर्षांपर्यंतचेच पुरावे सादर केले होते. त्यात कोणीही बोगस कागदपत्रे सादर केलेली नव्हती. मात्र, ती कागदपत्रे अपूर्ण होती. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्‍त, महापालिका, नगर 

महिनाभरात पुन्हा महासभा
महापालिका आयुक्‍तांची शिफारस मान्य करून पुन्हा नव्याने आचारसंहिता काढून महासभा घेणार आहोत. नामनिर्देशनपत्रांत कागदपत्रांची अपूर्णता होती. यापूर्वी हे नियम काटेकोरपणे अंमलात आणले गेले नव्हते. कागदपत्रे पूर्ण करून महिनाभरात पुन्हा महासभा बोलाविली जाईल. 
- बाबासाहेब वाकळे, महापौर 

पक्षनिहाय अर्ज सादर करणारे व त्यांच्या संस्था 
शिवसेना 

- संग्राम शेळके - साई सेवा संघ 
- मदन आढाव - नवनाथ देवस्थान ट्रस्ट व स्वामी प्रतिष्ठान 

राष्ट्रवादी कॉंग्रेस 
- विपूल शेटिया - विचारधन चेस ऍकॅडेमी व स्पोर्टस्‌ क्‍लब 
- बाबासाहेब गाडळकर - विचारधन चेस ऍकॅडमी व स्पोर्टस क्‍लब 

भाजप 
- रामदास आंधळे - सावली संस्था 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT