all over the country Grapes are exported from Tasgaon taluka  
पश्चिम महाराष्ट्र

या तालुक्याची द्राक्षे चाखतोय संपूर्ण देश

रवींद्र माने

तासगाव : यावर्षी दराकडून द्राक्ष हंगाम समाधानकारक नसला तरी परिसरातून दररोज 1700 ते 2000 टन द्राक्षे देशभरातील बाजारपेठेत रवाना होताना दिसत आहेत. सुमारे 200 छोटी मोठी वाहने आणि प्रचंड मनुष्यबळ यासाठी राबत आहे. 

यावर्षीचा द्राक्ष हंगाम तसा शेतकऱ्यांसाठी समाधानकारक नाही. कमी दर आणि वजनाची समस्या भेडसावत असली तरी द्राक्षे वेलीवर ठेवून शेतकऱ्यांना दराची वाट पहात बसता येत नाही. तालुक्यातून, मुंबई, दिल्ली बेंगळुरू, कोलकता, मद्रास, अहमदाबाद या मुख्य बाजारपेठांसह आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, ओरिसा, आसाम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यात द्राक्षे सुरू झाली आहेत. तासगाव मणेराजूरी आणि सावळज या तीन प्रमुख ठिकाणी सर्व भागातून द्राक्षे एकत्र करून देशभरात रवाना होत आहेत. पीक अपपासून 16 टनाच्या मोठ्या ट्रक अशी सुमारे 200 ते 250 वाहने अखंड पळत आहेत. मुंबई पुणे नाशिक आणि काही प्रमाणात बेंगळुरू वगळता दूर अंतराच्या वाहतुकीसाठी 16 टन क्षमता असलेल्या वाहनातून द्राक्षे वाहतूक केली जातात. मागणी आणि अंतराचे गणित बांधून इकडे गाड्या लोड केल्या जातात. तासगाव वाळवा आणि पलूस तालुक्यातील सुमारे 2000 टनापेक्षा अधिक द्राक्षे बाजारात सुरू आहेत. द्राक्षे वेलीवरून तोडल्यापासून चौथ्या दिवसापर्यंत पश्चिम बंगाल, बांगलादेश, उत्तराखंडपर्यंत पोहोच होण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले जातात. 

याशिवाय दुबई, श्रीलंका आणि युरोप, अन्य आखाती देशात द्राक्षे पाठविण्याची यंत्रणा वेगळी काम करते. यावर्षी वातानुकूलित कंटेनरची घरघर लक्षणीय कमी आहे. 

शेकडो हात राबतात
द्राक्ष तोडण्यापासून ते निवडून वजन करून पॅकिंग करून गाडीत लोड करेपर्यंत सकाळी सात वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत शेकडो हात काम करताना दिसत आहेत. द्राक्षे निवडून वजन करणे, पॅकिंग करण्यासाठी प्रत्येक द्राक्ष व्यापारी स्वतःचे कामगार आणतो. त्यांची मजुरी शेतकऱ्याला द्यावी लागते. अनेकदा हे कामगार त्या त्या राज्यातील असतात. 
 
विविध राज्यातून व्यापारी तासगावात 
कोलकत्ता, ओरिसा 7000 टन, पाटणा 10 हजार रु टन, दिल्ली 9 हजार रुपये टन शिवाय पुढे अंतर वाढेल तसा वाहतूक खर्च वाढतो. अंतर वाढेल तसे वाहन बदलते. प्रत्येक ट्रकवर दोन चालक काम करतात. हे मोठे ट्रक त्या त्या राज्यातून तेथील व्यापारी घेऊन आलेले दिसतात. त्यावरचे चालक क्लिनरसह यंत्रणा त्याच भागातील असते.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

SCROLL FOR NEXT