पश्चिम महाराष्ट्र

'अलमट्टीची उंची वाढवल्यास सांगली, शिरोळला धोका'

अजित झळके

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्नशील आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार असल्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे.

सांगली : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धरणाची उंची वाढल्यास सांगली आणि शिरोळला धोका निर्माण होणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्याला विरोध करावा असे आवाहन केले आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्नशील आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार असल्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. मात्र अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर त्याचा परिणाम महाराष्ट्रावर विशेष करून अलमट्टीला लागूनच असलेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यावर होणार आहे. त्यामुळे धरणाची उंची वाढवण्यास विरोध होत आहे. या धरणाची उंची सध्या 519 मीटर इतकी असून या ठिकाणी 135 टीएमसी पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. मात्र आणखी पाच मीटरने धरणाची उंची वाढविली तर धरणाची उंची ५२४ मीटर इतकी होणार आहे. मात्र यामुळे पाणी साठवण्याची क्षमता जवळपास २५ टीएमसीने वाढून ती १६० टीएमसी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना याचा फटका बसू शकतो अशी एक चर्चा जोर धरत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी नुकतीच अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याबाबत घोषणा केली असून त्याचा अध्यादेश लवकरच काढण्यात येईल असेही कर्नाटक सरकारने जाहीर केले आहे. त्याला महाराष्ट्र शासन काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा अभ्यास जलसंपदा विभाग करत असल्याचे म्हटंले आहे. या विभागाचे निष्कर्ष काय येतात ते पाहून आवश्यकता असल्यास कर्नाटक सरकारशी बोलू असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटंले आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगलीत म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवणे हे महाराष्ट्राला विशेष करून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना घातक आहे. अलमट्टीची उंची वाढवण्यास करारात परवानगी नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या निर्णयाला विरोध करावा. याआधीही अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात आली. ती कर्नाटकने दाबून वाढवली आहे. आता पुन्हा या धरणाची उंची वाढविल्यास सांगली आणि शिरोळ यांना महापुराचा धोका होऊ शकतो असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT