anger over exclusion of Jat taluk from drought Prahar activists damage tehsildar car marathi news Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : जत तालुक्याला दुष्काळातून वगळल्याने संताप; प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जत तहसिलदारांची गाडी फोडली

राज्य शासनाने आज राज्यातील ४० दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली. त्यात सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी जत तालुक्याला वगळण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

जत : राज्य शासनाने आज राज्यातील ४० दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली. त्यात सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी जत तालुक्याला वगळण्यात आले आहे. त्याबद्दल संताप व्यक्त करत प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जत तहसिलदारांची गाडी फोडली. तहसिलदार कार्यालय आवाजात आज सकाळी हा प्रकार घडला.

सांगली जिल्ह्यात दहा तालुके आहेत, पैकी शिराळा, मिरज, कडेगाव आणि खानापूर या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. अत्यंत तीव्र दुष्काळी स्थिती असलेल्या जत, आटपाडी तालुक्यांसह तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांचा त्यात समावेश नाही. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करावा, असा नव्याने प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल केला आहे.

त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, तोवर आज मध्यम दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जतमध्ये एकच संताप व्यक्त केला जात आहे. प्रहार संघटनेचे तालुक्याध्यक्ष सुनिल बागडे यांनी सकाळी तहसिलदार कार्यालय आवारात घोषणा देत त्यांनी तहसिलदार जीवन बनसोडे यांची टाटा सुमो ही गाडी फोडली.

दरम्यान, जत तालुक्यात सध्या संतापाची लाट आहे. तालुक्याची स्थिती दुष्काळी असताना शासन त्याकडे लक्ष देत नसल्याची भावना आहे. तेथील काँग्रेस आमदार विक्रम सावंत आणि भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सगळे मतभेद बाजूला ठेवून दुष्काळी प्रश्‍नावर धरणे आंदोलन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडवणसी यांच्यासोबत जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घडवून आणू, अशी ग्वाही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT