Awhad says RSS looted British palms 
पश्चिम महाराष्ट्र

video खळबळजनक :आव्हाड म्हणतात, आरएसएसने ब्रिटिशांचे तळवे चाटले 

सकाळ वृत्तसेवा

नगरः महात्मा गांधी यांनी 1942 रोजी ब्रिटिशांविरोधात आंदोलन छेडले होते. संपूर्ण देश या आंदोलनात सहभागी झाला होता. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) मात्र, या आंदोलनाला विरोध केला होता. देशाला स्वातंत्र्य मिळूच नये, असे त्यांना वाटत होते. याला ब्रिटिशांचे तळवे चाटणे म्हणायचे नाही तर काय? हा इतिहास आहे आणि तो मी फक्त सांगत आहे, असा खळबळजनक आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. 
सीएए कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड नगरमध्ये आले होते. त्यावेळी काही माध्यमकर्मींनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आम्ही कोणाची ब्लॅकमेलिंग केली नाही 
कायदा झालेला असताना त्याला विरोध करणे म्हणजे केवळ स्टंटबाजी आहे, असे हिंदू राष्ट्रसेनेचे म्हणणे आहे. याबाबत मंत्री आव्हाड यांना सवाल केला असता, आम्ही कुणाचा खून केलेला नाही. किंवा नंग्या तलवारी नाचवल्या नाहीत. आयुष्यभर त्यांनी रक्‍तपात केला आहे. बॉम्बस्फोट करणे, लोकांना ब्लॅकमेलिंग करणे हे त्यांचे काम आहे, असली गोष्ट आम्हाला जमणार नाही. आम्ही गांधींचे वारसदार आहोत. आम्ही केवळ संविधानाने शिकवण दिल्याप्रमाणे विरोध करीत आहोत, असेही आव्हाड म्हणाले. 

सीएए बहुजनांविरोधातील कायदा 
सीएए कायदा हा बहुजनांच्या विरोधात आहे. यासाठी आम्ही त्याला विरोध करीत आहोत. आमच्या पूर्वजांना गावातही येऊ दिले जात नव्हते. त्यांच्यासाठी स्मशानभूमीही नव्हती. गेल्या दोनशे वर्षांपूर्वी तरी होती का? माझे पणजोबा कुठे जाळले, याची माहितीही नाही. आमची लढाई मनुवादाविरोधात आहे. पारधी, गोसावी, कुडमुडे जोशी यांना आजही स्मशानभूमी नशिब नाही. व्यवस्थेला मानणाऱ्या लोकांनी याचे उत्तर द्यावे? जगात काळे-गोरे असाही वाद होता. परंतु क्षुद्रांइतके हिनतेचे जीवना कोणालाच जगावे लागले नाही, हा दाखलाही आव्हाड यांनी दिला. 


आघाडी प्रश्‍न सोडवेल 
महाराष्ट्रा महाविकास आघाडी आली आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्‍न सुटतील, काळजी करण्याचे कारण नाही. सर्व लोकांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असेही मंत्री आव्हाड यांनी स्पष्ट केले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT